Iran Hijab Controversy : हिजाबविरोधी निदर्शनात इराणमध्ये 50 जण ठार

Iran Hijab Controversy : हिजाबविरोधी निदर्शनात इराणमध्ये 50 जण ठार
Published on
Updated on

पुढारी ऑनलाइन डेस्क : Iran Hijab Controversy  इराणमध्ये 16 सप्टेंबर रोजी पोलीस कोठडीत 22 वर्षीय मुलीच्या 'महसा अमिनीचा' मृत्यू झाल्यानंतर सरकारविरोधी निदर्शने सुरू झाली. घटनेच्या आठ दिवसानंतरही अनेक महिला पुरुष रस्त्यावर उतरून सरकार विरोधात निदर्शने करत आहेत. तर सरकार हा विरोध दडपून टाकत आहे. सरकारने निदर्शकांना ताब्यात घेतले. तसेच सरकार विरोधी निदर्शकांवर सुरक्षा दलाकडून वेगवेगळ्या शहरात वेगवेवगळ्या घटनांध्ये तब्बल 50 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती समोर आली आहे.

महसा अमिनी या २२ वर्षीय महिलेचा पोलिस कोठडीत मृत्यू झाल्यानंतर इराणमधील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे. महसाला न्याय मिळवून देण्याची मोहीम आता तीव्र झाली आहे. अनेक ठिकाणी लोक रस्त्यावर उतरून महसाच्या मृत्यूचा निषेध करत आहेत. आंदोलक महिलांनीही चेहऱ्यावरील हिजाब काढून तीव्र निषेध व्यक्त केला आहे.

हिजाबसक्तीच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या महसा अमिनी या महिलेला पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर तिला पोलिसांनी अमानुषपणे मारहाण केली. अखेर कोठडीतच तिने शुक्रवारी (16 सप्टेंबर) प्राण सोडले. मीडिया रिपोर्ट्समध्ये मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगितले जात आहे. त्यावेळी मेहसा पोलिसांच्या ताब्यात होती. घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या साक्षीदारांचे म्हणणे आहे की, महसा अमिनी यांना तेहरानमधून अटक केल्यानंतर पोलीस ठाण्यात नेण्यात आले. मात्र, पोलिसांनी हे आरोप फेटाळले असून, अमिनी हिला कोठडीत असताना अचानक हृदयविकाराचा झटका आला.

महसा अमिनीच्या मृत्यूचे वृत्त देशातील अनेक भागात सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झाले. यानंतर राजधानी तेहरान आणि मशहादसह अन्य शहरांमध्ये महिला रस्त्यावर उतरल्या आहेत. अनेक महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्येही सरकारचा निषेध केला जात आहे. या आंदोलनात अनेक ठिकाणी महिलांनी केस कापून हिजाब जाळले आहे. याचे व्हिडिओही या महिलांनी सोशल मीडियातून शेअर केले आहेत. अनेक ठिकाणी अशा घटनांनंतर महिला आंदोलक आणि पोलिसांमध्ये हिंसाचार झाल्याची माहिती समोर येत आहे.
आज आठव्या दिवसानंतरही हिजाब विरोधात निदर्शने सुरूच आहेत. निदर्शने मोडून काढण्यासाठी सरकारने आंदोलकांवर प्रतिहल्ला चढवला आहे. वेगवेगळ्या ठिकाणच्या घटनेत आतापर्यंत 50 लोक ठार झाल्याचे वृत्त आहे. सोशल मीडियावरील सत्यापित केलेल्या पोस्टमधून ही माहिती बाहेर आली आहे. IHR म्हणते की रस्त्यावरील हिंसाचार 80 शहरे आणि शहरांमध्ये पसरला आहे, किमान 50 लोक निषेध रॅलीत मारले गेले आहे.

हे आंदोलन चिरडण्यासाठी इराण सरकारकडून वेगवेगळे उपाय केले जात आहे. आंदोलकांच्या निदर्शना दरम्यान प्रतिहल्ल्याच्या स्वरुपात सरकारच्या तसेच हिजाबच्या समर्थनार्थ आंदोलन केले. तसेच सरकारने निदर्शने मोडून काढण्यासाठी इंटरनेटच्या वापरावर बंधने आणली आहेत. ईराणमध्ये नेट ब्लॉक करण्यात आले आहे. जणू काही ई कर्फ्यू लावल्याची निती सरकार अवलंब करीत आहेत. तसेच ईराणच्या बाहेर नेटच्या माध्यमातून काहीही शेअर करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

उत्तर माझांदरन प्रांतातील बाबोल शहरात, निदर्शकांनी ऑनलाइन शेअर केलेल्या व्हिडिओंमध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांची प्रतिमा असलेला मोठा फलक जाळताना दिसला.

असत्यापित फुटेजमध्ये तेरहान डाउनटाउनमधील फरदौसी स्ट्रीटवर आंदोलकांनी घाबरलेल्या बसिज मिलिशियाच्या तळाला आग लावल्याचे दिसून आले. त्याची लगेच पडताळणी होऊ शकली नाही.

तर ईराणने जगाला दाखवण्यासाठी हिजाब समर्थनार्थ काउंटर रॅली काढून त्याचे व्हिडिओ व्हायरल केले. यामध्ये व्हिडिओत अगदी पुरुषसुद्धा काळ्या चादरी ओढून आले असल्याचे दिसत आहे.

इराणमध्ये १९७९ साली झालेल्या इस्लामिक क्रांतीनंतर देशात बाहेर फिरताना महिलांना हिजाब घालण्याची सक्ती करण्यात आली होती. डोकं, केस आणि मान झाकली जाईल, अशा पद्धतीचा हिजाब महिलांनी घालावा, असा नियमच इराणमध्ये करण्यात आला होता. त्यानंतर आता महिलांनी हिजाबविरोधात आंदोलन सुरू केल्यामुळं राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांचं सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news