वारणानगर, पुढारी वृत्तसेवा : जोतिबाच्या पायथ्याशी केखले (ता. पन्हाळा) येथे गेल्या चार-पाच दिवसांपासून ठाण मांडलेल्या 20 ते 25 गव्यांच्या कळपाने मगदूम खोर्यात धुमाकूळ घातला असून 50 एकर क्षेत्रावरील ऊस शेतीचा फडशा पाडला आहे. शेतकरी गस्त घालून गव्यांना हुसकावण्याचा प्रयत्न करीत आहेत.
सध्या खाण्यासाठी हिरवा चाराच नसल्याने गव्यांनी आपला मोर्चा थेट केखले येथील मगदूम खोर्यातील शेताकडे वळविला आहे. गेल्या काही दिवसांपासून मुक्काम करत गव्यांनी उभ्या ऊस पिकाचा फडशा पाडला आहे. शेतकरी एकत्र येऊन गव्यांना हुसकाविण्याचा प्रयत्न करीत आहेत.