5-जी सेवा अर्थव्यवस्थेसाठी ठरणार ‘सुपर बूस्टर’! हे होणार फायदे

5-जी सेवा अर्थव्यवस्थेसाठी ठरणार ‘सुपर बूस्टर’! हे होणार फायदे

Published on

मुंबई;  पुढारी वृत्तसेवा : आतापर्यंत मोबाईल तंत्रज्ञानाने 4 जी पर्यंत ज्या गतीने आयुष्य बदलले आणि जगण्याची गती वाढवली त्यापेक्षा दुप्पट वेगाने 5 जीची डिजिटल क्रांती येऊ घातली आहे. इंटरनेट ऑफ थिंग्ज, औद्योगिक आयओटी तसेच रोबोटिक्स तंत्रज्ञानातील प्रगतीची दारे खुली होतील. 'ई-गव्हर्नन्स'ची व्यापकता वाढेल. कोरोनात विस्कटलेली आर्थिक घडी आता सावरते आहेच. लसीचा 'बूस्टर डोस'ही सुरू आहे, इथून पुढे 5-जी सुरू होणे ही बाब अर्थव्यवस्थेसाठी 'सुपर बूस्ट' (चालना) ठरणार आहे.

कृषी, आरोग्य, रोजगार, शिक्षण अशा सर्वच क्षेत्रांमध्ये आमूलाग्र बदल होतीलच; पण रस्त्यावर चालकाशिवाय कार चाललेली आहे, याची कल्पनाही तुम्ही आज करू शकता का? नाही! तर… 5-जी सेवा सुरू होताच चालकरहित कार ही कल्पना वास्तवात उतरण्याची शक्यताही बळावणार आहे.

5-जी सेवेनंतर होणार हे फायदे

1) वेग वाढणार : मोबाईलवरील इंटरनेटचा वेग वाढेल. काही मिनिटांत नव्हे; तर काही सेकंदात तुम्ही काहीही डाऊनलोड करू शकाल. 'लाईव्ह स्ट्रिमिंग' कुठल्याही व्यत्ययाशिवाय तासन्तास सलग बघू शकाल.

2) जीव वाचणार : 5-जी रोड म्हणजेच रस्त्यांवर सेन्सर्सच्या मदतीने स्वयंचलित पद्धतीने लोकांचा जीव वाचवता येईल. 5-जीच्या मदतीने गाडीत सेन्सर काम करेल आणि तुमच्या वाहनाच्या आसपास कुठलाही धोका येताच यातील ऑटोनॉमस सिस्टीम त्याचा वेधही घेईल आणि आपोआप ब्रेकही लागेल.

3) शेतकर्‍यांना उपयुक्त : कृषी क्षेत्र डिजिटलाईज्ड होण्यात मोठी मदत होईल. ड्रोनच्या मदतीने 5-जी तंत्रातून जमिनीचा पोतही तपासता येईल. शेतकर्‍यांना त्याचा लाभ होईल.

4) रोजगार उपलब्ध होणार : नोकर्‍यांच्या, रोजगाराच्या संधी वाढतील. भारतासारख्या बेरोजगारी अधिक असलेल्या देशात तर 5-जी फारच उपयुक्त ठरणार. अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.

5) आरोग्य सुविधेस लाभ : 5-जीच्या मदतीने देशातील प्रत्येक नागरिकापर्यंत दर्जेदार आरोग्य सुविधा पोहोचवता येतील. मेडिकल डिव्हाईस जोडून कुणाचीही घरबसल्या वैद्यकीय तपासणी करता येईल. एक्स-रेही काढता येऊ शकेल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news