Belgaum crime : बेळगावात एका रात्रीत ५ दुकानात चोरी; व्यापाऱ्यांमध्ये खळबळ

Belgaum crime
Belgaum crime

बेळगाव ; पुढारी वृत्तसेवा शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या पांगुळ गल्लीसह विविध ठिकाणी एका रात्रीत Belgaum crime पाच दुकाने चोरट्यांनी फोडली आहेत. आज (शनिवार) सकाळी एकापाठोपाठ एक चोरीच्या घटना उघडकीस आल्याने व्यापाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. चोरट्यांनी धुडगूस घातल्याने पोलीस खात्याची देखील झोप उडाली आहे.

पांगुळ गल्ली आणि मेनसे गल्ली येथील एकूण तीन दुकाने फोडली आहेत. Belgaum crime त्याचबरोबर शनी मंदिर आणि अन्य एका ठिकाणी दोन दुकानात चोरीची घटना घडली आहे. आज सकाळी नेहमीप्रमाणे दुकान चालक आले असता, दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश केल्याचे दिसून आले. त्यानंतर एका पाठोपाठ एक चोरीची घटना उघडकीस आल्या.

तातडीने ही माहिती मार्केट पोलिसांना देण्यात आली. Belgaum crime एपीएमसी पोलिस स्थानकाच्या हद्दीत सराफी पेढीवर दरोड्याचा प्रयत्न झाल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा एका रात्री पाच दुकाने फोडण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news