Earthquake : जम्मू-काश्मीरच्या डोडा येथे ५.४ तीव्रतेचा भूकंप; दिल्लीसह उत्तर भारतातही धक्के

file photo
file photo

पुढारी ऑनलाइन डेस्क : Earthquake : राष्ट्रीय राजधानी दिल्लीसह एनसीआरमध्ये मंगळवारी दुपारी भूकंपाचे धक्के जानवले. तीव्रता कमी असली तरी दिल्लीकरांनी जवळपास ७ ते ८ सेकंदांपर्यंत भूकंप जानवला.श्रीनगर सह हिमाचल प्रदेश, हरियाणा, पंजाबमधील काही शहरांमध्ये ही भूकंपाचे धक्के जानवले.जम्मू-काश्मीर मधील किश्तवाड पासून ३० किलोमीटर दक्षिण-पूर्व मध्ये ५.४ रिक्टर स्केलच्या या भूकंपाचे केंद्र होते.राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिलेल्या माहितीनूसार जम्मू-काश्मीरमधील डोडात ५.४ रिक्टर स्केलचा भूकंप आला. या भूकंपाचे धक्के संपूर्ण उत्तर भारतात जानवले.दुपारी दीडच्या सुमारास भूकंप जानवला.

भूकंप विज्ञान केंद्राचे संचालक ओपी मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनूसार दुपारी १ वाजून ३३ मिनिटांनी जम्मू-काश्मिरमधील डोडात ५.४ रिक्टर स्केलचा भूकंप आला.५.४ रिक्टर स्केलच्या तीव्रतेचा भूकंप मध्यम ते शक्तीशाली श्रेणीत गणना केली जाते.अनेक भागात जमिनीत कंपन जाणवले. ४ ते ४.४ रिक्टर स्केलचा सौम्य भूकंपाचा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.या भूकंपाचा चक्रीवादळ बिपरजॉय सोबत कुठलाही संबंध नसल्याचे मिश्रांनी स्पष्ट केले.पंजाब मधील गुरूदासपूर, होशियारपूर, लुधियाना तसेच जालंधर मध्ये, हरियाणातील फतेहाबाद, हिमाचल मधील भरमोर, कुल्लू, उना, हमीरपूर, मंडीत भूकंप जाणवला.

आज मंगळवारी पहाटे तिबेटच्या शिझांग प्रांतात 4.3 तीव्रतेचा भूकंप नोंदवला गेला आहे. नॅशनल सेंटर फॉर सिसमॉलॉजीने याची ट्विट करून माहिती दिली आहे.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news