

महाड, पुढारी प्रतिनिधी : चार वाहनांचा विचित्र अपघातात दोघे गंभीर जखमी झाले. ही दुर्घटना आज ( दि. २७ ) सकाळी मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गावर घडली. सुरज रामा पवार (वय 22 रा. मु. मांडव शेत, ता. रोहा) राहुल दिलीप वाघमारे ( 23) अशी जखमींची नावे आहेत. त्यांना महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावर नडगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर स्कॉर्पिओ, पिकप व दुचाकी पोलादपूर करून महाडच्या दिशेने जात होत्या. पिकअपने पहिल्यांदा दुचाकीला धडक दिली. यानंतर स्कॉर्पिओला जावून आदळली. या अपघातात सुरज पवार आणि राहुल वाघमारे गंभीर जखमी झाले. घटनास्थळी महाड एमआयडीसी ठाण्याचे पोलीस अधिकार्यांनी पाहणी केली.
हेही वाचा :