Sanjay Raut : राणे भाजपच्या वॉशिंग मशिनमध्ये धुवून निघाले : संजय राऊत | पुढारी

Sanjay Raut : राणे भाजपच्या वॉशिंग मशिनमध्ये धुवून निघाले : संजय राऊत

पुढारी ऑनलाईन डेस्क: या देशामध्ये फक्त विरोधी पक्षातील लोकांनाच टार्गेट केलं जात आहे. जणू काही सत्ताधारी पक्षातील लोक दुधानेच अंघोळ करत आहेत. पण तुमचा प्रत्येक हल्ला आम्ही परतावून लावू. नारायण राणे भाजपमध्ये जाण्यापूर्वी भाजपची काय भूमिका होती? नारायण राणेंवर आधी भ्रष्टाचाराचे भाजपकडून आरोप झाले आणि आता ते केंद्रीय मंत्री आहेत. राणे भाजपच्या वॉशिंग मशिनमध्ये धुवून निघाले आहेत. म्हणत केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर संजय राऊत यांनी निशाणा साधला. वाचा सविस्तर बातमी. (Sanjay Raut )

आदित्य ठाकरे  शिवसेना, महाराष्ट्राचे आणि देशाचे भविष्य

संजय राऊत माध्यमांशी बोलत असताना म्हणाले, गेल्या काही दिवसात दोन महत्त्वाच्या घटना घडल्या एक म्हणजे भारताला RRR या चित्रपटातील नाटू नाटू गाण्याला आणि ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ (The Elephant Whisperers) या माहीतीपटाला ऑस्कर पुरस्कार मिळाला आणि काल आदित्य ठाकरे यांचे नाव वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या (WEF) २०२३ च्या ग्लोबल यंग लीडर्सच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये आदित्य ठाकरे विविध क्षेत्रात काम करत आहेत. त्यांचा ठसा उमटत आहे. याला आता आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता आहे. पुढे बोलत असताना ते असेही म्हणाले की, आदित्य ठाकरे महाराष्ट्राचे, देशाचे आणि शिवसेनेचे भविष्य आहे. हे मी वारंवार सांगत आलो आहे. आदित्य ठाकरे यांच्या निवडीनं आम्ही सर्व खुश आहोत.

Sanjay Raut :  विरोधी पक्षातील नेत्यांनाच टार्गेट

देशातील न्यायालयाकडून नागरिकांना अपेक्षा आहेत. या देशामध्ये फक्त विरोधी पक्षातील लोकांनाच टार्गेट केले जात आहे. जणू काही सत्ताधारी पक्षातील लोक दुधानेच अंघोळ करत आहेत. पण तुमचा प्रत्येक हल्ला आम्ही परतावून लावू असं माध्यमांशी बोलताना राऊत यांनी वक्तव्य केलं. पुढे बोलत असताना ते म्हणाले, नारायण राणे भाजपमध्ये जाण्यापूर्वी भाजपची काय भूमिका होती? नारायण राणेंवर आधी भ्रष्टाचाराचे भाजपकडून आरोप झाले आणि आता ते केंद्रीय मंत्री आहेत. राणे भाजपच्या वॉशिंग मशिनमध्ये धुवून निघाले आहेत. म्हणत त्यांनी राणेंवर निशाणा साधला. पुढे बोलत असताना ते असेही म्हणाले की, सोमय्यांप्रमाणे मी सुद्धा पुरावे दिले.
पण कारवाई झाली का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

हेही वाचा 

Back to top button