हिमाचल प्रदेशात हिमवर्षावामुळे ४८५ रस्ते बंद

हिमाचल प्रदेशात हिमवर्षावामुळे ४८५ रस्ते बंद
Published on
Updated on

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मोठ्या प्रमाणावर हिमवर्षाव सुरू असून त्याचा फटका वाहतूक व्यवस्थेवर झाला आहे. यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्त्यावर बर्फाचा मोठा खच पडल्यामुळे हिमाचल प्रदेशातील सुमारे 485 रस्ते बंद असून तेथील तापमान उणे 1.8 अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. तसेच दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा अलर्ट हवामान खात्याने दिला आहे.

दिल्ली-एनसीआरमध्ये रविवारी सकाळी जोरदार पाऊस झाला. राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. तसेच दिल्लीसह उत्तर भारतात दाट धुके पसरले होते. जम्मू-काश्मिरात मोठा हिमवर्षाव झाल्याने श्रीनगरकडे येणार्‍या फ्लाईट आणि 7 रेल्वे रद्द करण्यात आल्या. दिल्लीत दाट धुक्यामुळे कमी द़ृश्यमानता नोंदवण्यात आली. यामुळे काही विमान उड्डाणे आणि रेल्वे रद्द झाल्या. मध्य प्रदेश, राजस्थान, दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये कडाक्याची थंडी पडली असून या राज्यांतील किमान तापमान 6 ते 10 अंश सेल्सिअसदरम्यान नोंदले गेले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news