Karani Sena : करणी सेनेचे सर्वोच्च नेते लोकेंद्र सिंह कालवी यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन | पुढारी

Karani Sena : करणी सेनेचे सर्वोच्च नेते लोकेंद्र सिंह कालवी यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

पुढारी ऑनलाइन डेस्क : Karani Sena : पद्मावत चित्रपटाविरोधात मोठे आंदोलन उभे करणारे करणी सेनेचे शीर्ष संस्थापक राजपूत समाजाचे कोहिनूर लोकेंद्र सिंह कालवी यांचे हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. सोमवारी (दि.13) 12.30 वाजता त्यांचे निधन झाले. जयपूरच्या सवाई मान सिंह रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. पहाटे त्यांचे पार्थिव नागौर जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी आणण्यात आला. त्यांच्यावर आज दुपारी 2.15 वाजता अंतिम संस्कार केले जातील.

दरम्यान, त्यांच्या निधनाने राजपूत समाजावर मोठी शोककळा पसरली आहे. त्यांच्या अंत्यसंस्कारापूर्वी त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी करणी सेनेचे असंख्य कार्यकर्ते नागौर येथे पोहोचत आहेत.

Karani Sena : ऐतिहासिक चित्रपट-मालिकां विरोधी आंदोलनात महत्वाची भूमिका

लोकेंद्र सिंह यांनी राजस्थानातील करणी मातेच्या नावावरून 2006 मध्ये करणी सेनेची स्थापना केली. त्यांच्या नेतृत्वात जोधा-अकबर चित्रपट, मालिकांविरोधात आंदोलन करण्यात आले. त्यांच्या आंदोलनामुळे 2008 मध्ये जोधा-अकबर राजस्थानमध्ये प्रदर्शित होऊ शकले नाही. याशिवाय 2009 मध्ये सलमान खान यांच्या वीर चित्रपटाला त्यांनी विरोध केला होता.

याशिवाय 2018 मध्ये संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावत चित्रपटाला त्यांनी तीव्र विरोध केला होता. पद्मावत चित्रपटाच्या विरोधात त्यांनी केलेल्या आंदोलनामुळे करणी सेना मोठ्या चर्चेत आली होती. तसेच चित्रपटातील अनेक दृश्य रद्द केल्यानंतर हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला.

हे ही वाचा :

‘The Elephant Whisperers’ : ‘रघु’ला पाहण्यासाठी देश-विदेशातील पर्यटकांची ‘थेप्पाकडू’ला भेट

भारतीयांची विश्व भरारी!

Back to top button