Costa Titch : परफॉर्म करताना स्टेजवर कोसळून रॅपर कोस्टा टिचचा मृत्यू

Costa Titch
Costa Titch

पुढारी ऑनलाईन न्यूज : दक्षिण आफ्रिकेचा रॅपर आणि संगीतकार कोस्टा टिच (Costa Titch) यांचा जोहान्सबर्गमधील एका कार्यक्रमादरम्यान स्टेजवर कोसळून मृत्यू झाला आहे. कोस्टा टिच हा २७ वर्षांचा होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर कलाकारांसह चाहते शोक व्यक्त करत आहेत.

कोस्टा टिच ( Costa Titch ) हा जोहान्सबर्गमधील अल्ट्रा साऊथ आफ्रिका म्युझिक कॉन्सर्टमध्ये परफॉर्म करत होता. यावेळी गाण्यात गुंग असताना मध्येच अचानक तो स्टेजवर कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये तो स्टेजवर पडताना आणि बेशुद्ध झाल्याचे समजते. मात्र, त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
सोशल मीडियावर या घटनेची माहिती मिळताच दक्षिण आफ्रिका संसदेचे सदस्य ज्युलियस सेलो मालेमा यांच्यासह अनेक कलाकार, संगीत क्षेत्रातील कलाकार आणि चाहत्यांनी शोक व्यक्त केला आहे.

कोण आहे कोस्टा टिच?

कोस्टा त्सोबानोग्लू याला कोस्टा टीच या नावाने ओळखले जात असून त्याचा जन्म नेल्स्प्रूटमध्ये झाला आहे. प्रसिद्ध रॅपर आणि गीतकार म्हणनू त्याची वेगळी ओळख होती. शिवाय त्याला डान्सची खूपच आवड होती. कोस्टाने अनेक आंतरराष्ट्रीय डान्स स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. सोशल मीडियावर त्याचे ४५ लाखांहून अधिक फालोव्हर्स आहेत.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news