नाशिकमध्ये औरंगाबाद रोडचे झाले 'छत्रपती संभाजीनगर रोड' | पुढारी

नाशिकमध्ये औरंगाबाद रोडचे झाले 'छत्रपती संभाजीनगर रोड'

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा

औरंगाबाद शहराचे नामांतर होऊन छत्रपती संभाजीनगर असे नामकरण करण्यात आले असले तरीदेखील नाशिकमधील रस्त्यांवर दिशादर्शक फलकांवर जुनीच नावे असल्याची बाब लक्षात घेऊन राष्ट्रवादी युवक काँग्रेसने शहरातील अशा मार्गांवर ‘छत्रपती संभाजीनगर रोड’ असे दिशादर्शक फलक लावले. या फलकांचे अनावरण राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबाद शहराचे नामांतर करण्याची मागणी होत होती. अखेर औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’ तर उस्मानाबादचे ‘धाराशिव’ असे नामांतर झाले. मात्र, नाशिक शहरात पंचवटी परिसरात अजूनही ‘औरंगाबाद रोड’ असेच फलक असून, उच्चारही तसाच केला जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी याची गांभीर्याने दखल घेत नवीन आडगाव नाका येथील भागात ‘छत्रपती संभाजीनगर रोड’ असे दिशादर्शक फलक लावले.

यावेळी शहर सरचिटणीस संजय खैरनार, शंकर मोकळ, अमर तांबे, ज्ञानेश्वर जाधव, दीपक पाटील, संदीप गांगुर्डे, संदीप खैरे, संतोष जगताप, कुलदीप जेजुरकर, नीलेश सानप, जयवंत गोडसे, सागर तांबे, नीलेश जाधव, राम शिंदे, राज रंधवा, सागर पुरकर, सचिन आहिरे, महेश जाधव, रवि सोमसे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते व परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा :

 

Back to top button