अलिबाग : २५० कोटी रुपयांचा अंमली पदार्थांचा साठा नष्‍ट; सीमाशुल्क विभागाची कारवाई | पुढारी

अलिबाग : २५० कोटी रुपयांचा अंमली पदार्थांचा साठा नष्‍ट; सीमाशुल्क विभागाची कारवाई

अलिबाग ; पुढारी वृत्तसेवा आडीरआय, एनसीबी, मुंबई सीमाशुल्क विभाग आणि मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांचा समावेश असलेल्या सीबीआयसीच्या उच्चस्तरीय अंमली पदार्थ नष्ट करणार्‍या समितीने काल (गुरुवार) तब्‍बल २५० कोटी रूपयांच्या अंमली पदार्थाचा साठा नष्‍ट केला. हेरॉइन, कोकेन, एमडीएम, गांजा, ट्रामडॉल, अल्प्राझोलम, जेपीडिओल, रडोल, झोलफ्रेश आणि डिझी-डिझेपाम टॅब्लेट यासारख्या 61.586 किलो नार्कोटिक्स अंमली पदार्थ आणि मनावर परिणाम करणारे (सायकोट्रॉपिक) घटक हे रायगड जिल्ह्यातील तळोजा येथील सामान्य घातक कचरा प्रक्रिया साठवण आणि विल्हेवाट सुविधेद्वारे जाळून सुरक्षितपणे विल्हेवाट लावण्यात आली.

बेकायदेशीर एनडीपीएस माल रोखण्यात आणि मुंबई सीमाशुल्क परिक्षेत्र -1 च्या अखत्यारीत त्यांची वेळेवर विल्हेवाट लावण्यात विविध सीमाशुल्क विभागाच्या एजन्सींच्या सक्रिय भूमीकेमुळे, अंदाजे 250 कोटी रुपये (बेकायदेशीर बाजारपेठेतील त्यांच्या किंमतीनुसार) विविध बेकायदेशीर उपक्रमात वळण्यापासून रोखण्यात आले.

या यशस्वी विल्हेवाटीचा उद्देश अमली पदार्थांच्या तस्करीच्या घातक परिणामांपासून समाजाचे रक्षण करणे आणि बळकट अंमलबजा वणी उपायांचे महत्त्व अधोरेखित करणे हा असल्याचे सीमाशुल्क विभागाने म्हटले आहे.

हेही वाचा ; 

Back to top button