Mamata Banerjee : भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा दणदणीत विजय | पुढारी

Mamata Banerjee : भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा दणदणीत विजय

image=”http://”]काेलकाता: पुढारी ऑनलाईन[/author]

 मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी भवानीपूर-पश्चिम बंगालच्या भवानीपूर विधानसभा जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत विजय मिळविला आहे. ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी भाजपच्या प्रियंका टिब्रेवाल यांचा ५८८३२ मतांनी पराभव केला.

ममता यांच्यासाठी ही निवडणूक खूपच प्रतिष्ठेचा विषय बनली होती.

या पोटनिवडणुकीत ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना एकूण ८४७०९ मते मिळाली आहेत. तर भाजपच्या प्रियंका टिब्रेवाल यांना २६३२० इतकी मते मिळाली आहेत.

सीपीएम उमेदवार श्रीजीब यांना केवळ ४२०१ इतकीच मते मिळू शकली आहेच.

यावर भाष्य करताना प्रियंका टिब्रेवाल म्हणाल्या की, “मी पराभव स्वीकार करते. पण, मी न्यायालयात जात नाही. ते लोक म्हणत होते, की ममता १ लाख मतांनी जिंकतील. त्यांना जवळपास ५० हजार मते मिळाली आहेत.

मी ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन करते. मात्र, त्यांनी ज्या पद्धतीने निवडणूक जिंकली, ते सर्वांनीच पाहिले आहे”, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

 

Back to top button