Rinku Rajguru : एकच हृदय आहे फक्त तुझ्यासाठीच धडकतं❤️(photo) | पुढारी

Rinku Rajguru : एकच हृदय आहे फक्त तुझ्यासाठीच धडकतं❤️(photo)

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिग्दर्शक नागराज मंजुळे याच्या ‘सैराट’ चित्रपटातील आर्चीला कोण ओळखत नाही. या चित्रपटातील आर्चीची मुख्य भूमिका मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरूने ( Rinku Rajguru) उत्तमरित्या साकारली आहे. सैराटशिवाय रिकू कागर, मेकअप, आठवा रंग प्रेमाचा आणि बिग बी अमिताभ बच्चनसोबतचा ‘झुंड’ यासारख्या अनेक चित्रपटात अभिनयाची छाप पाडली आहे. चित्रपटातील अभिनयासोबत रिंकू सोशल मीडियावरदेखील तिचे नवनवीन अपडेट्स देत असते. आता तिच्या नो मेकअपमधील लूकची जोरदार चर्चा होत आहे.

अभिनेत्री रिंकू राजगुरूने ( Rinku Rajguru)ने नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर सकाळीच फोटो शेअर केले आहेत. यावेळी तिने ब्ल्यू ॲण्ड केसरी कलरच्या लाईन्स क्रॉफ्ट शर्ट परिधान केला आहे. हा फोटो खास करून विना मेकअप केलेला असून यात ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. तर रिंकूने यावेळी हॉप शोल्डर टॉपनं सर्वाचं लक्ष वेधून घेतले आहे. नेहमी आपण रिंकूला मेकअपमध्ये जास्त करून पाहतो, मात्र, यावेळी तिला विना मेकअप फोटोने सोशल मीडियात चर्चेत आली आहे.

या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने ‘allow yourself to transform as many times as you need to be fully happy and free 🌈🧚🏻‍♀️❤️’. असे लिहिले आहे. तर या फोटोला तिने #nomakeup #moments असे हॅशटॅग दिले आहेत. कधी केसांची पोनी तर कधी केस मोकळे सोडत एका पेक्षा एक हॉट आणि किलर पोझ दिल्या आहेत. यावेळी खास करून रिंकूच्या कानात एअररिग्स फक्त पाहायला मिळत आहेत. खरं तर रिंकूच्या हास्याने, लाजणं आणि नजरेने चाहत्यांना दिवाने केले आहे. हा फोटो चाहत्याच्या पसंतीस उतरला आहे.

सोशल मीडियावर हा फोटो शेअर होताच चाहत्यांसह मराठी अभिनेत्री श्रेया बुगडेने भरभरून कौतुकाचा वर्षाव केला आहे. ‘छान दिदु ❤️’, ‘Beautiful😍’, ‘od is so kind to create you and put you on earth’, ‘looking so gorgeous in the first pic itself ❤️’, ‘अब क्या बताये हमारा हाल ❤️🥵🥰’, ‘So cute darling 💓’, ‘Nice darling ❤️😘’, ‘सुंदर…. Love you’, ‘true pics of beauty 😍❤️’, ‘तुम्ही यार खुप छान दिसता’, ‘SAIRAT BEAUTY ❤️’, ‘Cutest 😍😍’, ‘hyee hyee♥️😍’, ‘Kya baath hai yaar ❤️ RINKU R❤️’, ‘Looking very pretty Rinku😘’, ‘Quite smile ❤️’, ‘एकच हृदय आहे फक्त तुझासाठीच धडकतं❤️’, यासारख्या कॉमेन्टस केल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरच्या ईमोजींनी कॉमेन्टस सेक्शन बॉक्स भरला आहे. या फोटोला एका तासांत १५ हजांराहून अधिकांनी लाईक्स केले आहे.

हेही वाचा : 

Back to top button