ब्रेकिंग: नेपाळला ५.२ रिश्टरचा भूकंप; उत्तराखंडसह दिल्ली, उत्तरप्रदेश हादरले | पुढारी

ब्रेकिंग: नेपाळला ५.२ रिश्टरचा भूकंप; उत्तराखंडसह दिल्ली, उत्तरप्रदेश हादरले

पुढारी ऑनलाईन: नेपाळमधील बाजुरा भागात बुधवारी (दि.२२) १.४५ च्या सुमारास ५.२ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपाचे धक्के उत्तराखंड, दिल्ली एनसीआर आणि उत्तर प्रदेशातील काही भागांना देखील बसले आहेत, अशी माहिती येथील राष्ट्रीय भूकंप निरीक्षण आणि संशोधन केंद्राने दिली आहे.

नेपाळमधील भूकंपाने  उत्तराखंडमध्येही ४.४ रिश्टरचे धक्के जाणवले. तर दिल्ली, उत्तर प्रदेश आणि हरियाणा या राज्यांना देखील  भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत.  नेपाळमधील जुमलापासून ६९ किमी अंतरावर  १० किमी खोलीवर असल्याचे राष्ट्रीय भूकंपविज्ञान केंद्राने सांगितले आहे.

उत्तराखंडमध्येही भूकंप ४.४ रिश्टरचे धक्के

उत्तराखंडमधील फितोरगढच्या १४३ किमी पूर्वेला, १० किमी खोलीवर केंद्रबिंदू असलेल्या ठिकाणी सुद्धा भूकंपाचे धक्के बसले आहे. बुधवारी (दि.२२) दुपारी १.४५ च्या सुमारास हे भूकंपाचे धक्के बसले असल्याची माहिती राष्ट्रीय भूकंपविज्ञान केंद्राने दिली आहे.

नेपाळमध्ये गेल्या काही महिन्यांपासून वारंवार भूकंप होत आहेत. यापूर्वी 24 जानेवारी रोजी नेपाळमध्ये 5.8 तीव्रतेचा भूकंप झाला होता. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये, नेपाळमध्ये 6.3 तीव्रतेचा भूकंप झाला होता. दरम्यान डोटी जिल्ह्यात घर कोसळून झालेल्या घटनेत किमान सहा जणांचा मृत्यू झाला. या भूकंपाचे धक्के दिल्ली-एनसीआर भागातही जाणवले होते.

Back to top button