गडचिरोली : मार्कंडादेव येथे महाशिवरात्री यात्रेला लोटली अलोट गर्दी | पुढारी

गडचिरोली : मार्कंडादेव येथे महाशिवरात्री यात्रेला लोटली अलोट गर्दी

गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा : ‘विदर्भाची काशी’ अशी ओळख असलेल्या चामोर्शी तालुक्यातील मार्कंडादेव येथे आजपासून महाशिवरात्रीनिमित्त यात्रेला सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी लाखो भाविकांनी पहाटेपासूनच शिवलिंग आणि मार्कंडेश्वराच्या दर्शनासाठी रांगा लावल्याचे दिसून आले.

आज पहाटे खासदारआ. डॉ. देवराव होळी यांनी सपत्नीक शिवलिंग आणि मार्कंडेश्वराची पूजाअर्चा  केली. या यात्रेत विविध विभागांच्या वतीने शासकीय योजनांची माहिती देणारे स्टॉल लावण्यात आले आहेत. पाच ते सहा दिवस ही यात्रा सुरु असणार आहे. या यात्रेत विदर्भासह शेजारच्या छत्तीसगड, मध्यप्रदेश, तेलंगणा आणि आंध्रप्रदेशातूनही हजारो भाविक दर्शनासाठी आले आहेत. यात्रेकरुंसाठी गडचिरोली व अहेरी आगारांसह नागपूर, चंद्रपूर आणि मूल येथूनही विशेष बसेस सोडण्यात येत आहेत. कुरखेडा तालुक्यातील अरततोंडी येथील हेमांडपंथी महादेव मंदिरात आ. कृष्णा गजबे यांनी पूजाअर्चा केली. वैरागड, चपराळा या ठिकाणीही महाशिवरात्रीनिमित्त यात्रा भरली असून, भाविक दर्शन घेत आहेत.

हेही वाचा

 

Back to top button