Somavati Amavasya 2023 : सोमवती अमावस्या रविवारी की सोमवारी, जाणून घ्या पूजा मुहूर्त व विधी | पुढारी

Somavati Amavasya 2023 : सोमवती अमावस्या रविवारी की सोमवारी, जाणून घ्या पूजा मुहूर्त व विधी

पुढारी ऑनलाइन डेस्क : Somavati Amavasya 2023 : हिंदू धर्मात अमावस्येच्या तिथीला खूप महत्व आहे. पंचांगानुसार प्रत्येक अमावस्येचे वेगळे नाव वैशिष्ट्य आणि महत्व आहे. मात्र, काही अमावस्यांना विशेष महत्व आहे. त्यापैकीच सोमवती अमावस्या एक आहे. जी अमावस्या सोमवारी येते तिला सोमवती अमावस्या म्हटले जाते. मात्र 2023 या वर्षात सोमवती अमावस्येची तिथी रविवार आणि सोमवार विभागून आली आहे. त्यामुळे सोमवती अमावस्येची पूजा कधी करावी हे जाणून घेऊ या.

हिंदू पंजांगानुसार फाल्गुन मासाच्या कृष्ण पक्षाच्या अमावस्येला सोमवती अमावस्या आहे. पंचांगानुसार यावेळी अमावस्या प्रारंभ रविवारी होत असून समाप्ती सोमवारी होत आहे. त्यामुळे अमावस्येची पूजा व्रत विधी कधी करावे याविषयी लोकांमध्ये संभ्रम आहे.

Somavati Amavasya 2023 : सोमवती अमावस्येचा तिथी

रविवारी (दि. 19) सायंकाळी 4 वाजून 18 मिनिट तिथी प्रारंभ
सोमवारी (दि. 20) दुपारी 12 वाजून 35 मिनिटांनी तिथी समाप्ती

पंचांगानुसार दोन दिवस तिथी आली असेल तर उदय तिथीनुसार अमावस्या ग्राह्य धरली जाते. उदय तिथीनुसार सोमवती अमावस्या 20 फेब्रुवारी 2023 दुपारी 12 वाजून 35 मिनिटांनी ग्राह्य धरावी आणि सर्व पूजा विधी सोमवारी दुपारपर्यंतच करावे.

Somavati Amavasya 2023 : सोमवती अमावस्येचे महत्व

तसे पाहता हिंदू धर्मशास्त्रांनुसार प्रत्येक अमावस्येचे स्वतःचे वैशिष्ट्य आणि महत्व असते. मात्र, सोमवती अमावस्या ही विशेष आणि वेगळी असतो. यादिवशी पितरांना तर्पण करून त्यांचे विशेष आशीर्वात प्राप्त करता येता. पितरांच्या आशीर्वादाने जीवन में सुख-समृद्धी प्राप्त होते. त्याचबरोबर या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे देखील खूप महत्वाचे मानले गेले आहे. या दिवशी शिवाची आराधना केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. भगवान शिवशंकर सह माता पार्वतीची देखील पूजा करावी. यामुळे दाम्पत्य जीवन सूखी राहते. या व्यतिरिक्त शाही स्नानानंतर सूर्याला अर्घ्य देऊन गायत्री मंत्राचा जाप करावा. तसेच नंतर गरीब आणि गरजूंना भोजन किंवा वस्त्र दान करावे. देवी लक्ष्मीची पूजा केल्याने भरभराट होते.

Somavati Amavasya 2023 : पूजा मुहूर्त

सोमवारी सकाळी 6 वाजून 56 मिनिटांपासून सकाळी 8 वाजून 20 मिनिटांपर्यंत अमृत काल असेल. तसेच 9 वाजून 45 मिनिटांपासून ते 11 वाजून 10 मिनिटांपर्यंत दान करण्यासाठी उत्तम मुहूर्त असेल.

हे ही वाचा :

Mahashivratri Special 2023 : महाशिवरात्रीला महादेवाच्या विशेष कृपेने ‘या’ राशीच्या लोकांचा होणार भाग्योदय

Air India चा बोईंग, एअरबस सोबत करार, भारतात २ लाख नोकऱ्यांची संधी!

 

Back to top button