लंडननंतर सर्वाधिक ट्रॅफिक जाम बंगळूरमध्ये; पुणे सहाव्या, मुंबई ४७, तर दिल्ली ३४ व्या स्थानी | पुढारी

लंडननंतर सर्वाधिक ट्रॅफिक जाम बंगळूरमध्ये; पुणे सहाव्या, मुंबई ४७, तर दिल्ली ३४ व्या स्थानी

बंगळूर : वृत्तसंस्था : ब्रिटनची राजधानी लंडननंतर भारतातील बंगळूर सर्वात जास्त वाहतूक कोंडी होणारे जगातील दुसरे महानगर आहे. डच लोकेशन टेक्नॉलॉजी स्पेशॅलिस्ट टॉमटॉमच्या निर्देशांकातून ही माहिती समोर आली आहे. बंगळूरच्या लोकांना गतवर्षी कारने १० कि.मी. अंतर कापण्यासाठी जवळपास अर्धा तास (२९ मिनिटे १० सेकंद) लागतो. ट्रॅफिक जामच्या यादीत दिल्ली आणि मुंबई अनुक्रमे ३४ वे व ४७ व्या स्थानी आहेत. पुणे या यादीत सहाव्या स्थानी आहे.

लंडनमध्ये २०२२ मध्ये १० कि.मी. प्रवासासाठी १ सरासरी ३६ मिनिटे, २० सेकंद लागले. बंगळूरूत २०२१ च्या (१४ कि.मी.) तुलनेत काहीशी सुधारणा झाली. गर्दीच्या वेळी सरासरी गती ताशी १८ कि.मी. होती. २ बंगळूर २०२१ मध्ये १० वे सर्वाधिक जामचे शहर होते. या शहरात लोकांनी सरासरी २६० तास (१० दिवस) ड्रायव्हिंगमध्ये व १३४ तास जाममध्ये घालवले. आयर्लंडचे डब्लिन तिसरे सर्वाधिक जामचे शहर ‘ठरले. सहा खंडांतील ५६ देशांतील ३८९ शहरांचा या सर्व्हेअंतर्गत वाहतूक कोंडी समस्येवर वर्क फ्रॉम होम हा एक उत्तम उपाय ठरू शकतो, असा निष्कर्ष काढण्यात आला.

Back to top button