हसन मुश्रीफ यांच्या विरोधात सोमय्या राज्यपालांकडे - पुढारी

हसन मुश्रीफ यांच्या विरोधात सोमय्या राज्यपालांकडे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी ग्रामपंचायती, पंचायत समित्या, जिल्हा परिषदेचे टीडीएस आणि जीएसटी भरण्याचे कंत्राट आपल्या जावयाशी संबंधित कंपनीला दिल्ल्याची तक्रार भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे गुरुवारी केली.

या कंत्राटासाठी फक्त सात दिवसांची वेळ देण्यात आली. या काळात दोन दिवसांची सुट्टी असल्याने ही निविदा फक्त पाच दिवसांत पूर्ण करण्यात आली. तब्बल दीड हजार कोटी रुपयांचे टेंडर केवळ पाच दिवसांचा वेळ देऊन निश्चित करण्यात आले. ही घाई ग्रामविकास विभागाने का केली, असे सोमय्या म्हणाले.

ज्या कंपनीला काम मिळाले ती कंपनी मुश्रीफ यांचे जावई मतीन यांच्याशी संबंधित असून, हे टेंडर देण्यासाठी सासरे मुश्रीफ यांनी ही घाई केली, असा आरोप सोमय्या यांनी केला आहे.

Back to top button