Konkan Coastal Tourism : कऱ्हाटेश्वर, नांदिवडे अन्‌ जयगडला जा फिरायला | पुढारी

Konkan Coastal Tourism : कऱ्हाटेश्वर, नांदिवडे अन्‌ जयगडला जा फिरायला

स्वालिया शिकलगार-पुढारी ऑनलाईन डेस्क : मागील काही दिवसांपासून आपण वेंगुर्ला, वालावल, मालगुंड, अंबोली, राजापूर, तांबळडेग, मीठमुंबरी, दहिबाव, मीठबाव, मालवण अशा पर्यटन ठिकाणांची सफर केलीय. महाराष्ट्राला लाभलेली इतकी लांब किनारपट्टी आणि नजरेत भरणारा निळाशार समुद्र…प्रत्येक ठिकाणी वेगळं वैशिष्ट्य पाहायला मिळतं. (Konkan Coastal Tourism) रुपेरी वाळूत, माडांच्या बनात, दूरदूरवर समुद्र लाटांवर हेलकावणाऱ्या होड्या, आसमंतात पसरलेले निळे आकाश, पहावी तिकडं माडाची झाडं, पोफळी-सुपारीच्या बागा, खळखळत्या समुद्रात डोकावून पाहणारा चमकणारा सूर्य असा निसर्ग डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी भटकंती तर करायलाच हवी. आता आम्ही तुमच्यासाठी आणखी काही पर्यटन स्थळे घेऊन आलोय. ही ठिकाणे आहेत गणेशगुळे, पावस, जयगड आणि बरंच काही. तुम्ही गणपतीपुळेला गेला असालचं. पण, गणपतीपुळेपासून अगदी जवळ असणारी ही ठिकाणे पाहिली का? कुठे कुठे फिराल आणि काय खाल, याविषयी इत्यंभूत माहिती आम्ही इथे देत आहोत. (Konkan Coastal Tourism) लेख शेवटयर्यंत वाचा.

ganeshgule beach

गणपतीपुळे –

रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे हे प्रसिद्ध धार्मिक पर्यटनस्थळ आहे. हा गणपती स्वयंभू आहे. मंदिराच्या समोरचं अथांग पसरलेला समुद्रकिनारा असून इथे वॉटर स्पोर्ट्ससाठी पर्यटकांची गर्दी असते. रो-बोटिंग, मोटरबोट, वॉटर स्कूटर, केळी बोट राईड करण्यासाठी आणि निळाशार समुद्रात मनसोक्त डुंबण्यासाठी पर्यटक इथे गर्दी करतात. गणपतीपुळेमध्ये खूप सारे हॉटेल्स आणि निवासी घरे आहेत, जिथे तुम्ही राहू शकता.

ganeshgule beach

गणपतीपुळेच्या परिसरातील ही ठिकाणे एकदा नक्की फिरा

प्राचीन कोकण संग्रहालय – प्राचीन काळात कोकण कसा होता? तेव्हाचे राहणीमान, संस्कृती यासारखी असंख्य माहिती या प्राचीन कोकणमधून तुम्हाला अनुभवता येईल. त्याकाळातील लोकांच्या वेशभूषा, बारा बलतेदार, शेतीची अवजारे, त्यांची केशभूषा, लाकडी आणि मातीची भांडी, मंदिरे, यासारख्या गोष्टींची प्रतिकृती आणि मंदिरे पाहता येतील. त्याकाळात अनेक औषधी वनस्पतींचा वापर कसा व्हायचा, याचीदेखील माहिती तुम्हाला पाहता येईल.

काय खाल?

आवळा, जांभूळ, कोकम सरबत, उन्हाळ्यात कैरी पन्हे, मोदक, पुरणपोळी, थालीपीठ, अळुवडी, मासे, काजू, कोकम फळ, मच्छी करी आदी.

मालगुंड- गणपतीपुळेपासून मालगुंड हे कवी केशवसुत यांचे जन्मस्थान आहे. येथे त्यांचे त्याकाळातील घर आणि स्मारकदेखील पाहायला मिशते. याची इत्यंभूत माहिती आपण मागे पाहिली आहे.

The Birthplace of Lokmanya Tilak

गणेशगुळे :

गणेशगुळे मंदिर – गणेशगुळे हे श्री गणेशाचे स्थान आहे. रत्नागिरी-पावस-पूर्णगड या मार्गावर गणेशगुळे गाव आहे. ते मुख्य रस्त्यापासून आत असल्याने पटकन लक्षात येत नाही. गणेशगुळेतील गणपतीला स्वयंभू म्हटले जाते. कारण मंदिरात एक मोठी शिळा असून ती दक्षिणाभिमुख आहे. मंदिर जांभ्या दगडात बांधले गेले आहे. मंदिराजवळ समुद्रकिनारा आहे. गणेशगुळे गाव मुसाकाजी बंदराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील डोंगर आणि बंदरासमोरील डोंगर याच्या मध्यभागी वसले आहे.

ganeshgule temple

कसे जाल- रत्नागिरीपासून २५ किमी. तर पावसपासून ४ कि.मी. गणेशगुळे आहे. मुंबई ते रत्नागिरी ३६० कि.मी अंतर आहे.
गणेशगुळे समुद्र – स्वच्छ सुंदर समुद्रकिनारा, जिथे फारसे पर्यटक जात नाहीत. इथे खूप शांतता आणि भिरभिरणारे वारे अनुभवायला मिळते. शांतता आहे म्हणूनचं इथे स्वच्छता टिकून आहे. निसर्गाचा खरा अनुभव घ्यायचा असेल तर इथे एक रात्र राहायलाच हवं. गणेशगुळे आणि आजुबाजूच्या परिसरात खूप सारे रेस्टॉरंट, हॉटेल्स आणि निवासाची सोय आहे. (Konkan Coastal Tourism)

ratndurg

प्राचीन दगडांची विहिर – प्राचीन दगडांची विहिर ही पांडवकालीन असल्याचे म्हटले जाते. जांभ्या खडकात असलेली ही विहिर ७० फूट खोल आहे.

ratndurg

स्वयंभू गजानन मंदिर – रत्नागिरी शहरापासून पावस मार्गावर फक्त १२ कि.मी. अंतरावर, श्री संत गजानन महाराजांचे सुंदर मंदिर आहे. रत्नागिरीजवळ गोळप या ठिकाणी हे गजानन महाराजांचे मंदिर खूप शांत, स्वच्छ आहे.

ratndurg

पावस – पावस हे रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी तालुक्यातील गाव असून स्वामी स्वरुपानंद मठामुळे पावसचे नाव खूप प्रसिद्ध झाले आहे.

karhateshwar mandir nandiwade
karhateshwar mandir nandiwade

पूर्णगड किल्ला – पावस देवस्थानापासून पूर्णगडचा किल्ला १५ मिनिटांच्या अंतरावर आहे.

purngad fort

जयगड किल्ला – गणपतीपुळेपासून २० किलोमीटर अंतरावर जयगडचा किल्ला आहे.

जयगड लाईट हाऊस – नांदिवडे येथे तुम्ही जयगडचे लाईट हाऊस पाहू शकता. जवळच नांदिवडे बीच पाहू शकता.

रत्नागिरी फिश मरीन म्युझियम – रत्नागिरीतील फिश मरीन संग्रहालय पाहण्यासारखे असून रत्नागिरी बसस्थानकपासून अडीच किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. जाताना भगवती मंदिर आणि मांडवी बीचदेखील पाहता येईल.

या संग्रहालयात दुर्मिळ आणि सुंदर नमुने आहेत. सी टर्टल्स, ईल्स, सी हॉर्स फिश, लायन फिश, ट्रिगर फिश, सी काकडी, स्टार फिश आदी नमूने पाहता येतात. या संग्रहालयात व्हेलचा मौल्यवान आणि जुना सांगाडा देखील आहे. या व्हेलची मूळ लांबी ५५ फूट लांब आणि वजन ५ जार किलोग्रॅम असल्याचे म्हटले जाते. जवळच मुरुगवाडा आणि व्हाईट सीच बीचलाही भेट देऊ शकता.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जन्मस्थान – रत्नागिरी फिश मरीन म्युझियमीासून १०-१२ मिनिटांच्या अंतरावर हे ठिकाण आहे.
कऱ्हाटेश्वर मंदिर – खूप सारी एनर्जी देणारा हा परिसर आहे. राजापूर तालक्यातील नांदिवडे गावात हे मंदिर असून जयगडच्या किल्ल्यापासून १२ मिनिटांच्या अंतरावर हे मंदिर आहे. हे ८०० ते १००० वर्ष जुनं हे मंदिर असल्याचं म्हटलं जातं. तर रत्नागिरीपासून ४८ किमी. अंतरावर हे ठिकाण आहे.

The Birthplace of Lokmanya Tilak

आणखी काय पहाल-मुसाकाजी बंदर, आंबोळगड, यशवंतघेरा गड किल्ला, गगगनिरी महाराजांचा आंबोळगडमधील मठ, रानपार जेटी, मत्स्यालय, वॅक्स म्युझियम, मॅजिक मिरर, मालगुंड बीच, प्राचीन कोकण संग्रहालय, जय विनायक मंदिर आणि बाग, आरे-वारेचा बीच, रत्नादुर्ग किल्ला, गणपतीपुळे-रामरोडवर कोकणातील अश्मयुगीन कातळशिल्प, जयगड तवसाळ फेरी बोट, सेल्फी पॉईंट रावसा बंदर, थिबा पॅलेस.

Back to top button