गुडघेदुखीमुळे राहुल गांधी भारत जोडोतून घेणार होते माघार | पुढारी

गुडघेदुखीमुळे राहुल गांधी भारत जोडोतून घेणार होते माघार

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची भारत जोडो यात्रा नुकतीच यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. याबाबात आता काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी मोठा खुलासा केला आहे. ते म्हणाले की, भारत जोडो यात्रेला सुरुवात झाली त्यावेळी सर्व काही ठीक नव्हते.

यात्रेच्या तिसर्‍या दिवशी म्हणजे यात्रा केरळमध्ये होती. त्यावेळी राहुल गांधी यांना गुडघेदुखीचा त्रास सुरू झाला होता. त्यामुळे राहुल गांधी यांनी त्यांच्याविना यात्रा सुरू ठेवण्याची सूचना केली होती. राहुल गांधी यांना गुडघेदुखीचा खूपच त्रास सुरू झाला होता. प्रियांका गांधी यांचाही फोन आला होता. प्रकृतीची काळजी घेऊन त्यांनी यात्रेचे नेतृत्व वरिष्ठ नेत्यांकडे सोपवण्याची राहुल गांधी यांना विनंती केली होती. राहुल गांधी यांच्याशिवाय यात्रेचा विचार केला जाऊ शकत नाही, अशी भूमिका सर्व नेत्यांनी मांडली होती. त्यानंतर राहुल गांधी शिफारस केलेल्या फिजिओथेरपिस्ट भेटीला गेले. त्यांनी राहुलवर उपचार केले आणि त्याचा त्रास हळूहळू बरा झाला. केरळमधील पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद साधताना राहुल गांधी यांनी गुडघेदुखीबद्दल कार्यकर्त्यांना सांगितले होते.

ज्यावेळी काळ कठीण असतो त्यावेळी काँग्रेस पक्ष नेहमीच कार्यकर्ते आणि जनतेचा आधार घेतल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले होते, असे वेणुगोपाळ म्हणाले.

Back to top button