कोल्हापूर : महापालिका टँकर खाली सापडून महिलेचा मृत्यू

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : वर्दळीच्या बिंदु चौक (जि.कोल्हापूर) सबजेल रस्त्यावर महापालिकेच्या पाण्याच्या टँकर खाली सापडून रेखा अभिनंदन शहा यांचा मृत्यू झाला. आज (दि.५) सकाळी दहाच्या सुमारास हा अपघात झाला आहे. माहितीनूसार रेखा या मुलगा मेहुल शहा याच्या मोटरसायकलवरून जात असताना हा अपघात या घटनेची नोंद जुना राजवाडा पोलिसात झाली आहे.
माहितीनुसार, रेखा शहा त्यांच्या मुलासोबत देवदर्शनासाठी निघाल्या होत्या. बिंदु चौक (जि.कोल्हापूर) येथे रस्त्याकडेला पार्किंग केलेल्या वाहनांना शहा यांच्या दुचाकीचा धक्का लागला. शहा रस्त्यावर कोसळल्या. याचवेळी पाठीमागून आलेला टँकरच्या खाली रेखा आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. शहा यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी आणला असता त्यांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती
हेही वाचा
- कोल्हापूरात रात्रीत 8 बंगले फोडले; 5.50 लाखांचे दागिने लंपास
- कोल्हापूर : तिसऱ्या विकास योजनेसाठी विद्यमान भू वापर नकाशांचे काम कोणाला मिळणार?
- सुपरक्यूट जोडी अमेय-वैदेहीसह अजय-अतुल येणार कोल्हापूरकरांच्या भेटीला
- ईडी चौकशीचा तणाव : कोल्हापूर जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यास हृदयविकाराचा झटका