

पुढारी ऑनलाइन डेस्क : अर्थमंत्री निर्मला सीतारमण या देशाचा 2023-24 चा अर्थसंकल्प सादर करत आहेत. या अर्थसंकल्पात त्यांनी रेल्वेसाठी 2.40 लाख कोटी रुपयांचे भांडवल प्रदान करण्यात आले आहे. ते 2013-14 पासूनची ही 9 पट अधिक भांडवली गुंतवणूक असल्याचे, अर्थमंत्र्यांनी या वेळी स्पष्ट केले. असून 75 हजार कोटी या नवीन योजनांसाठी ठेवण्यात आल्या आहेत.
2022-2023 या आर्थिक वर्षांत रेल्वेसाठी १.४ लाख कोटी रुपयांचा निधी देण्यात आला होता. त्यामुळे अर्थसंकल्प २०२३-२४मध्ये रेल्वेसाठी जास्तीची तरतुद अपेक्षित होती. मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन, वंदे भारत रेल्वे यासाठीही भरीव निधी अपेक्षित होता.
याशिवाय अमृत भारत स्टेशन योजनेत १ हजार स्टेशनचा पुर्नविकास केला जाणे अपेक्षित आहे. २०२२-२०२३मध्ये नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडला १९,१०२ कोटींचा निधी देण्यात आला होता. रेल्वे बोर्डच्या अधिकाऱ्यांनी सरकारकडे रेल्वेसाठीच्या बजेटमध्ये ३०टक्के वाढ करण्याची मागणीही केलेली होती.
रेल्वे मंत्रालय हायड्रोजनवर चालणाऱ्या नव्या प्रकारच्या निर्मिती करत आहे. या इंधनामुळे प्रदूषणही कमी होणार आहे, तसेच इंधनावरील खर्चही मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे.
चिनाब रेल्वे पूल, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन, बैराब – सैरंग नवा रेल्वे मार्ग, भलूपकाँग-तवांग मार्ग असे काही प्रकल्प रेल्वेने यापूर्वीच हाती घेतले आहेत..