कोणत्याही गोष्टीचा अतिविचार करणं कसं टाळाल ? वाचा तज्ञ काय म्हणतात | पुढारी

कोणत्याही गोष्टीचा अतिविचार करणं कसं टाळाल ? वाचा तज्ञ काय म्हणतात

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोणतीही कृती करताना विचारपूर्वक करावी असा सल्ला आपल्याला नेहमी दिला जातो. कारण विचार करण हा मानवी मनाचा स्थायीभाव आहे. आपण सगळेच विचार करणं या प्रक्रियेतून जात असतो. पण विचार करण्याचं अतिविचार करण्याकडे रूपांतर होत नाही हे पाहणं गरजेचं ठरतं. अतिविचार करण्याची सवय अनेकदा आपल्याही नकळत लागते. या सवयीमुळे फायदा होण्याऐवजी नुकसान होण्याची शक्यता जास्त असते. अतिविचार करण्याची सवय असलेल्या व्यक्ती अनेकदा कोणत्याही निर्णयाबाबत गोंधललेल्या दिसतात. त्यामुळे सहज सोपे वाटणारे निर्णय घेणंही त्यांच्यासाठी टास्क होऊन बसतो.

अनेकदा अतिविचार करणारी माणसं भविष्यातील काही घटना, शक्यता किंवा परिणाम यांच्याविषयी कल्पनेतच नकारात्मक विचार करतात. परिणामी त्या कृतीमधील त्यांचा आत्मविश्वास हरविण्याची शक्यता जास्त असते. मानसिक आरोगयाबाबत बोलताना केवळ विशिष्ट मानसिक आजारांबाबत बोललं जातं. पण अतिविचार किंवा overthinking हे देखील मानसिक आरोग्याच्या संदर्भात लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. सतत येणाऱ्या या विचारांना दरवेळी कोणती दिशा असतेच असं नाही. त्यामुळे अनेकदा महत्त्वाच्या आणि मूळ मुद्यांकडे दुर्लक्ष होणं किंवा त्याला पुरेसं महत्त्व न दिलं जाणं ही देखील अनेकदा घडतं. शिवाय विचार करणं ही प्रक्रिया मानसिकदृष्ट्या थकवणारी असते.

अतिविचार करण्याचे तोटे :

  • मानासिक आजारांची शक्यता वाढते : अतिविचार करणं अनेकदा मानसिक आजारांना आमंत्रण देणारं असू शकतं.
  • तार्किक विश्लेषण करण्यात अडचणी : अतिविचार करणारी व्यक्ति अनेकदा विचारातील स्पष्टता हरवून बसते.
  • मानसिक थकव्याच्या अनेक कारणांपैकी एक : सतत सुरू असलेले विचार अनेकदा तुम्हाला mental drain करतात. त्यामुळे मानसिक थकवा येऊन चिडचिड वाढते.
  • मानसिक अस्वस्थता : सतत विचार करत राहिल्यास दैनंदिन कामावर त्याचा परिणाम होऊ लागतो. या सगळ्याचा एकाग्रतेवर परिणाम होतो. सोप्या गोष्टीमध्ये येणाऱ्या अडचणी अस्वास्थता वाढवू शकतात.
  • निर्णयक्षमतेवर परिणाम करते : सतत विचार करणारी व्यक्ति अनेकदा निर्णय घेताना ठाम असतेच असं नाही.
  • झोपेवरही परिणाम : सतत विचार करत असलेल्यांना कितीही मानसिक थकवा असला तरी शांत झोप घेणं अशक्य होऊन बसत. सतत विचार करण्याने झोप तुटक होते. त्याचा परिणाम थेट कार्यक्षमतेवर होतो.

अतिविचार टाळण्यासाठी हे जरूर करा :

  • शक्य असल्यास शांत रहा : अनेकदा बोलण्यातून विचारांची शृंखला वाढत जाते. काही वेळा गरज असताना बोललं जातं. अशा वेळा ओळखा शक्य असल्यास शांत राहणं हा पर्याय निवडा.
  • ब्रेक ही महत्त्वाचा : अनेकदा विचारांच्या पाठी वाहावत जातो. अशावेळी ब्रेक सगळ्यात महत्वाचा आहे. अतिविचार होतो आहे असं वाटू लागलं की तो विचार, मुद्दा तिथेच सोडून द्या. स्वत:ला वेगळ्या वातावरणात न्या. जेणेकरून बदलामुळे आपोआप विचारांना ब्रेक लागेल.
  • सोशल डिटॉक्स महत्त्वाचा : अलीकडे सोशल डिटॉक्स म्हणजे सोशल मिडियापासून काहीकाळ लांब राहणं. ही महत्वाची आणि गरजेची संकल्पना अतिविचार टाळण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. सोशल मीडिया बंद करणं अगदीच अशक्य आहे त्यांनी सोशल मीडिया वापरण्याच्या वेळा ठरवाव्यात.
  • ऐकायला सुरुवात करा : बोलण्यात आणि विचार करण्यात जेवढी एनर्जी लागते तेवढी ऐकण्यात तुलनेने कमी लागते. त्यामुळे केवळ कानावरून गोष्टी न घालवता अॅक्टिव श्रोता होण्याचा प्रयत्न करा.

Back to top button