Chittah ReIntroductry : भारतात दक्षिण आफ्रिकेतून आणखी 12 चित्ते येणार | पुढारी

Chittah ReIntroductry : भारतात दक्षिण आफ्रिकेतून आणखी 12 चित्ते येणार

पुढारी ऑनलाइन डेस्क : चित्ता पुर्नस्थापन प्रकल्पाअंतर्गत Chittah ReIntroductry नामिबियानंतर आता दक्षिण आफ्रिकेतून आणखी 12 चित्ते भारतात येणार आहेत. पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेतून या चित्त्यांना पाठविले जाईल. हे चित्ते भारतात दाखल झाल्यानंतर भारतात चित्त्यांची एकूण संख्या 20 इतकी होणार आहे.

भारतातून नामशेष झालेल्या चित्त्याला पुन्हा एकदा भारतात पुर्नस्थापन Chittah ReIntroductry करण्याचा प्रकल्प भारत सरकारने हाती घेतला आहे. त्या अंतर्गत गेल्या वर्षी 17 सप्टेंबर 2022 ला नामिबियातून मागवलेल्या 8 चित्त्यांना मध्यप्रदेश येथील कुनो राष्ट्रीय उद्यानात पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते सोडण्यात आले होते. त्या आठ चित्त्यांमध्ये 5 माद्या आणि तीन नर होते. हे चित्ते रुळल्यानंतर चित्त्यांची संख्या वाढवण्यासाठी आता द. आफ्रिकेतून आणखी 12 चित्ते मागवण्यात येणार आहेत.

“फेब्रुवारीमध्ये 12 चित्त्यांच्या आयातीनंतर, पुढील आठ ते 10 वर्षांसाठी दरवर्षी आणखी 12 चीते स्थानांतरीत करण्याची योजना आहे,” असे पर्यावरण मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले.

या 12 चित्त्यांना देखील सुरुवातीला कुनो उद्यानात स्थानांतरित करण्यात येणार आहे. याबाबत भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात नुकताच सामंजस्य करार झाला आहे. या कराराबाबत पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.

Chittah ReIntroductry : यादव म्हणाले, “पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारचे दूरगामी संरक्षण परिणामांसह चित्तांचे पुनर्संचयित करणे ही प्राथमिकता आहे. दक्षिण आफ्रिकेतील चित्त्यांचे स्वागत करण्यासाठी भारत उत्सुक आहे.”

दोन्ही देशात स्वाक्षरी करण्यात आलेल्या सामंजस्य करारानुसार, देश तंत्रज्ञानाच्या हस्तांतरणाद्वारे मोठ्या मांसाहारी प्राण्यांच्या संवर्धनाच्या सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण करतील आणि दोन राष्ट्रांमध्ये स्थलांतरित केलेल्या चित्तांसाठी द्विपक्षीय संरक्षक व्यवस्था स्थापन करतील, असे म्हटले आहे.

हे ही वाचा :

 

Back to top button