सत्ताधाऱ्यांना बहुमताचा आकडा गाठणे कठीण – शरद पवार | पुढारी

सत्ताधाऱ्यांना बहुमताचा आकडा गाठणे कठीण - शरद पवार

पुढारी ऑनलाईन:सी व्होटर सर्व्हे हा खरं चित्र दाखवणारा, यातून सत्ताधाऱ्यांना दिशा मिळेल. पण सत्ताधाऱ्यांना बहुमताचा आकडा गाठणे कठीण आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांसाठी, सर्व्हे हा चिंतेचा विषय बनला असल्याचे, शरद पवार यांनी स्पष्ट केले. कोल्हापूरात आयोजित पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार बोलत होते.

पुढे ते म्हणाले, प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या समस्या आहेत. निवडणूकांच्या तोंडावर फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे.  लोकप्रतिनिधींना मूळ पक्षातून इतर पक्षात नेण्याचे काम केलं जातय. विरोधकांवर कारवाईसाठी तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. जनतेच्या अधिकारांवर गदा आणली जातेय. त्यामुळे बहुमत सत्ताधाऱ्यांकडे राहणार नाही. मविआ एकसंग, दुफळी नाही. मविआ एकत्र आहे. त्यामुळे विरोधकांना एकत्र आणण्यासाठी आमचा प्रयत्न आहे,असे मत शरद पवार यांनी स्पष्ट केले.

वंचित आघाडी बरोबरच्या युतीवर बोलताना म्हणाले, वंचित सोबत युती करण्याचा अद्याप प्रस्ताव नाही. प्रकाश आंबेडकरांशी अजून आमची चर्चा नाही. प्रस्तावच नाही तर तो स्वीकारायचा की, नाही याचा निर्णय कसा घेता येईल, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले. गेल्या काही दिवसांपासून पहाटेच्या शपथविधीमागे शरद पावर मास्टरमाईंड असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावर स्पष्टीकरण विचाराले असता, पहाटेच्या शपथविधीचा मुद्दा आता कुठे? असा उलट प्रश्न शरद पवार यांनी उपस्थित केला.

राहुल गांधी यांच्या भारत जोडोला देशाने पाठिंबा दिला आहे. लोक राहुल गांधींना लोक गांभीर्याने घेत असल्याचेही; शरद पवार यांनी पत्रकार परिषदेदरम्यान स्पष्ट केले.

लाईव्ह पत्रकार परिषद :

Back to top button