MS Dhoni-Hardik Pandya : क्रिकेटमधील जय-वीरू रांचीमध्ये एकत्र | पुढारी

MS Dhoni-Hardik Pandya : क्रिकेटमधील जय-वीरू रांचीमध्ये एकत्र

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि न्यूझीलंड दरम्यानच्या टी 20 मालिकेला २७ जानेवारीला सुरुवात होणार आहे. मालिकेतील पहिला सामना रांची येथील झारखंड क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. टी20 मालिकेत भारताकडून युवा खेळाडू मैदानात उतरणार आहेत. कारण अनेक वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. (MS Dhoni-Hardik Pandya) न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी हार्दिक पंड्याच्या खांद्यावर कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पहिल्या सामन्यासाठी भारतीय संघ रांचीमध्ये दाखल झाला आहे.

भारतीय संघ रांचीमध्ये दाखल होताच कर्णधार हार्दिक पंड्याने वेळ काढत माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची भेट घेतली. हार्दिक पंड्याने धोनीची भेट घेतल्यानंतर फोटो सोशल मीडीयावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये हार्दिक आणि धोनी एका बाईकवर बसलेले पहायला मिळत आहेत. हार्दिक गाडी चालवत आहे तर धोनी शेजारील जागेवर बसला आहे. (MS Dhoni-Hardik Pandya)

हा फोटो शेअर करताना हार्दिक पंड्याने लिहिले आहे की, शोले २ लवकरच येणार आहे. हार्दिक ज्या बाईकवर बसला आहे. ती बाइक अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांच्या शोले या चित्रपटातून सर्वांच्या पसंतीस उतरली होती. तेव्हापासून ही बाइक चर्चेत आली होती. तेव्हापासून ही बाइक शोलेमधील बाईक म्हणून ओळखली जाते. (MS Dhoni-Hardik Pandya)

२६ जानेवारीलाच धोनीच्या नेतृत्वात हार्दिकचे टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण

हार्दिक पंड्याने २६ जानेवारी दिवशीच भारताकडून पहिला टी20 सामना खेळला होता. धोनीच्या नेतृत्वात हार्दिकने आपल्या आंतरराष्ट्रीय करियरला सुरुवात केली होती. यानंतर हार्दिकने मागे वळून पाहिले नाही. त्याने गुजरात टायटन्सला आयपीएलचा किताबही जिंकवून दिला. टी20 क्रिकेटमध्ये भारतीय संघाच्या पूर्णवेळ कर्णधारपदासाठी हार्दिक पंड्या प्रबळ दावेदार मानला जात आहे. (MS Dhoni-Hardik Pandya)

हेही वाचंलत का?

Back to top button