Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचे फेसबुक इन्स्टाग्राम खाते दोन वर्षाच्या निलंबनानंतर पुन्हा सुरू | पुढारी

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचे फेसबुक इन्स्टाग्राम खाते दोन वर्षाच्या निलंबनानंतर पुन्हा सुरू

पुढारी ऑनलाइन डेस्क : फेसबुकने अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यावरील बंदी उठवली असून दोन वर्षाच्या निलंबनानंतर त्यांचे खाते पुन्हा सक्रिय करण्यात आले आहे. फेसबुकची मूळ कंपनी मेटाने ब्लॉग पोस्टद्वारे हा निर्णय जाहीर केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी 2021 मध्ये कॅपिटलमध्ये हिंसक कृत्यांमध्ये गुंतलेल्या लोकांची प्रशंसा केल्याबद्दल रिपब्लिकनला निलंबित करण्यात आले होते. आज दोन वर्षानंतर हे निलंबन मागे घेतले आहे.

फेसबुकने आप्या ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे की लोकांना त्यांचे राजकारणी (Donald Trump) काय म्हणत आहेत हे ऐकता यायला हवे, समजायला हवे. जेणेकरून ते मतपेटीतून माहितीपूर्ण निवड करू शकतील.

तसेच फेसबुकने असेही म्हटले आहे की, ट्रम्प (Donald Trump) यांचे खाते पुन्हा सक्रिय करण्यात आले असले तरी ट्रम्प यांनी कोणतीही उल्लंघन करणारी सामग्री पोस्ट केल्यास ती सामग्री तात्काळ काढून टाकण्यात येईल. तसेच उल्लंघन केल्याबद्दल पोस्टच्या तीव्रतेनुसार पुन्हा 1 महिना ते दोन वर्षांसाठी त्यांचे खाते पुन्हा निष्क्रिय करून गोठवण्यात येईल. निलंबित केले जाईल.

फेसबुक ही केवळ जगातील सर्वात मोठी सोशल मीडिया साइट नसून ट्रम्प (Donald Trump) यांच्या मोहिमेसाठी निधी उभारणीचा एक महत्वाचा स्रोत होता. फेसबुकच्या या निर्णयामुळे ट्रम्प यांना आगामी निवडणुकीसाठी त्यांच्या 34 दशलक्ष अनुयायांशी थेट संवाद साधता येईल. इतकेच नव्हे तर त्यांना थेट निधी उभारणीस पुन्हा सुरू करण्यास देखील अनुमती मिळणार आहे. ट्रम्प यांच्या निलंबना दरम्यान त्यांच्या समर्थकांनी त्यांच्यासाठी पैसे उभारणी केली. मात्र, या काळात थेट त्यांच्याकडून किंवा त्याच्या आवाजात जाहिराती त्यांना चालवत्या आल्या नाहीत.

फेसबुक इन्स्टाग्रामने ट्रम्पवरील(Donald Trump) त्यांचे निलंबन हटवण्यापूर्वी ट्विटरने देखील ट्रम्प यांचे खाते पुन्हा सक्रिय केले होते. एलॉन मस्कने कंपनीची सूत्रे हाती घेताच ट्रम्प यांचे खाते पुन्हा सुरू केले होते. असे असले तरी ट्रम्प यांनी अद्याप ट्विटरवरून कोणतेही ट्विट केले नाही.

हे ही वाचा :

Google layoff : Google च्या सीईओंना गुंतवणूकदाराचा सल्ला; आणखी कर्मचारी कपातीची केली मागणी

पोस्ट ऑफीस उघडं आहे : प्रजासत्ताक दिनानिमित्त सैन्यदलासाठी विशेष शुभेच्छा पत्रे

Back to top button