रश्मी ठाकरे यांच्या नावाचा वापर बंगले घेण्यासाठी; किरीट सोमय्या यांचा आरोप | पुढारी

रश्मी ठाकरे यांच्या नावाचा वापर बंगले घेण्यासाठी; किरीट सोमय्या यांचा आरोप

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रश्मी ठाकरे वहिनींच्या नावाचा बंगले घेण्यासाठी वापर केला. त्यांच्या नावाने 21 बनले बनविले, असा गंभीर आरोप भाजप नेते माजी आमदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. मंगळवारी कोल्हापूर येथे जाऊन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घोटाळ्यांच्या विरोधात तक्रार दाखल करतानाच त्यांचा तिसरा घोटाळा बाहेर काढू, त्यामुळे मुश्रीफ यांना मंत्रिमंडळाबाहेर जावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला.

किरीट सोमय्या सोमवारी सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाले. ते मुरगुड आणि कागल पोलीस ठाण्यात हसन मुश्रीफ यांच्या विरोधात तक्रार दाखल करणार आहेत. गेल्यावेळी मला कोल्हापूर ला येण्यापासून अडविले. हिम्मत असेल तर आता मला अडवून दाखवा असे थेट आव्हान त्यांनी राष्ट्रवादीला दिले. त्याचवेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला.
आपल्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी घोटाळ्यांचे पुरावे असतील तर त्याचा पाठपुरावा करा, अशा सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे आपण आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे आणि नेत्यांचे घोटाळे पुराव्यासह बाहेर काढू असा इशाराही त्यांनी दिला.

उद्धव ठाकरेंनी रायगड जिल्ह्यात अनाधिकृत21 बंगले घेतले असून हे बंगले घेताना रश्मी वहिनींच्या नावाचा वापर केला आहे. त्या वहिनी असल्याने आपल्याला काही मर्यादा येत आहेत, असे सोमय्या म्हणाले.

Back to top button