Shraddha Murder Case : ‘…म्हणून केला होता आफताबने श्रद्धाचा खून’, दिल्ली पोलिसांकडून 6,636 पानांचे आरोपपत्र दाखल, वाचा आरोपपत्रात काय म्हटले आहे… | पुढारी

Shraddha Murder Case : '...म्हणून केला होता आफताबने श्रद्धाचा खून', दिल्ली पोलिसांकडून 6,636 पानांचे आरोपपत्र दाखल, वाचा आरोपपत्रात काय म्हटले आहे...

पुढारी ऑनलाइन डेस्क : Shraddha Murder Case : श्रद्धा वालकर खून प्रकरणी मंगळवारी दिल्ली पोलिसांनी आरोपी आफताब पुनावाला याच्यावर 6,636 पानी आरोपपत्र दाखल केले. यावेळी पोलिसांनी आपल्या आरोपपत्रात म्हटले आहे, आफताबने रागाच्या भरात श्रद्धाचा खून केला. नंतर तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे करून ते आपल्या दक्षिण दिल्लीतील महरौली येथील फ्लॅटमधील फ्रीजमध्ये ठेवले. त्यानंतर छतरपूरच्या जंगल परिसरात हे तुकडे फेकून दिले.

Shraddha Murder Case : दिल्ली पोलिसांनी मंगळवारी साकेत न्यायालयात आफताबला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर केले. पोलिसांनी त्याच्यावर 6,636 पानांचे आरोपपत्र दाखल केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धा ही 17 मे रोजी तिच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी गुरुग्रामला गेली होती. ती थेट दुस-या दिवशी त्यांच्या घरी परतली. श्रद्धा मैत्रिणीला भेटायला का गेली होती या गोष्टीवरून दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर रागाच्या भरात आफताबने श्रद्धाची गळा आवळून हत्या केली.

आरोपपत्रात पोलिसांनी 100 साक्ष्यांसह फॉरेन्सिक आणि इलेक्ट्रॉनिक पुरावे दिले आहेत. तसेच छतरपूरच्या जंगलातून सापडलेली हाडे श्रद्धा वालकरची असल्याची पुष्टी करणारा डीएनए अहवालही आरोपपत्रात जोडण्यात आला आहे.

Shraddha Murder Case : आफताबने पोलिसांसमोर आपल्या लिव्ह-इन पार्टनर श्रद्धाचा गळा आवळून खून करून तिच्या शरीराचे 35 तुकडे केल्याची कबुली दिली. तसेच गेल्या वर्षी मे महिन्यात त्याने मृतदेहाचे तुकडे दक्षिण दिल्लीतील मेहरौली येथील त्याच्या निवासस्थानी फ्रीजमध्ये ठेवले होते, त्यानंतर अनेक दिवस जंगलात टाकून दिले होते.

दरम्यान, आफताबच्या न्यायालयीन कोठडीत 7 फेब्रुवारीपर्यंत वाढ करण्यात आली आहे. आफताबने आपल्या विद्यमान वकिलाला दिलेल्या आरोपपत्रावर आक्षेप घेत म्हटले आहे की, आपला कायदेशीर प्रतिनिधी बदलण्याचा त्यांचा मानस आहे.

हे ही वाचा :

Share Market Today | जागतिक संकेत नकारात्मक, सेन्सेक्स ३०० अंकांनी घसरला, ऑटो वगळता सर्वच क्षेत्रांत विक्रीचा सपाटा

टीम इंडिया वन-डेतही नंबर वन

Back to top button