Earthquake : अर्जेंटिनाला भूकंपाचे जोरदार धक्के | पुढारी

Earthquake : अर्जेंटिनाला भूकंपाचे जोरदार धक्के

पुढारी ऑनलाईन डेस्क : आज शनिवारी (दि.२१) पहाटे ३ वाजून ३९ मिनिटांनी अर्जेंटिनाला भूकंपाचे जोरदार धक्के बसले. हा भूकंप ६.५ रिश्टर स्केलचा होता. अशी माहिती राष्ट्रीय भूकंपविज्ञान केंद्राने दिली आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू ५८६ किमी खोल अर्जेंटिनाच्या कार्डोबापासून ५१७ किमी उत्तरेस होता.

अमेरिकेच्या भूवैज्ञानिक सर्वेक्षणानुसार पॅराग्वे आणि अर्जेंटिनामध्ये या भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. मात्र अद्याप कोणत्याही प्रकारे नुकसान झाल्याचे वृत्त नाही.

१६ जानेवारीला सुमात्रामध्ये झाला होता भूकंप

यापूर्वी 16 जानेवारीला इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटाच्या किनाऱ्यावर भूकंपाचा जोरदार धक्का बसला होता. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.1 इतकी नोंद झाली होती.

Back to top button