Sanjay Raut VS Deepak Kesarkar : 'खून करा नाहीतर तुरुंगात टाका; तुमच्या धमक्यांना भीक...'राऊतांचे केसरकरांना प्रत्युत्तर | पुढारी

Sanjay Raut VS Deepak Kesarkar : 'खून करा नाहीतर तुरुंगात टाका; तुमच्या धमक्यांना भीक...'राऊतांचे केसरकरांना प्रत्युत्तर

ढारी ऑनलाईन डेस्क : ”खून करा नाहीतर तुरुंगात टाका, तुमच्या धमक्यांना भीक घालत नाही,” अशा कडक शब्दांत शिवसेना (ठाकरे गट) नेते खासदार संजय राऊत यांनी शालेय शिक्षण मंत्री आमदार दीपक केसरकर यांना प्रत्युत्तर दिले आहे. तसेच केसरकरांच्या ”तुरुंगात टाकण्याच्या धमकीचा” संदर्भ देत तुम्ही न्याय व कायदा यांनाही खोके देऊन गुलाम केले आहे का? असा प्रश्न ट्विटरवरून उपस्थित केला आहे. या ट्विटला त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील टॅग केले आहे. वाचा नेमके काय आहे प्रकरण…

Sanjay Raut VS Deepak Kesarkar : तुरुंगात जाण्याची तयारी ठेवावी 

दीपक केसरकर यांनी, “संजय राऊत यांनी पुन्हा एकदा तुरुंगात जाण्याची तयारी ठेवावी”, असे धमकीवजा विधान केले होते. आज सकाळी माध्यमांशी बोलत असताना या विधानावर संजय राऊत म्हणाले, पक्षासाठी जेलमध्येही जाण्यासाठी तयार आहोत. आम्ही तुमच्यासारखे लफंगे, पळकुटे नाही. तुम्ही म्हणजे न्यायालय नाही, कायदा नाही, असे म्हणत २०२४ साली त्यांनीही तुरूंगात जाण्याची तयारी ठेवावी, असा इशाराही दिला.

त्यानंतर त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर ट्विट करत काही प्रश्न उपस्थित करत केसरकर यांच्या त्या विधानाला प्रत्युत्तर दिले. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांनाही टॅग केले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “संजय राऊत यांना पुन्हा तुरुंगात टाकण्याची धमकी शिंदे गटाचे मंत्री केसरकर यांनी दिली. याचा अर्थ काय? न्याय व कायदा तुमच्या कोठीवर नाचत आहे ? खोके देऊन त्यांना गुलाम केले आहे का? हुकूमशाहीचा अंत होईल. तुमच्या धमक्यांना भीक घालत नाही. खून करा नाहीतर तुरुंगात टाका.”

हेही वाचा :

Back to top button