Balochistan Protest : बलुचिस्तानमध्ये विरोध प्रदर्शनादरम्यान पोलिसाचा मृत्यू, कर्फ्यू लागू | पुढारी

Balochistan Protest : बलुचिस्तानमध्ये विरोध प्रदर्शनादरम्यान पोलिसाचा मृत्यू, कर्फ्यू लागू

पुढारी ऑनलाइन डेस्क : Balochistan Protest : बलुचिस्तानचे बंदर शहर ग्वादरमध्ये पाकिस्तानच्या प्रांतीय सरकारकडून कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. शुक्रवारी या संबंधीचे अधिकृत स्टेटमेंट जारी करण्यात आले आहे. या आठवड्यात विरोध प्रदर्शनाला हिंसेचे गालबोट लागले. संघर्षादरम्यान एका पोलिसाचा मृत्यू झाला. त्यानंतर शहरात विरोध प्रदर्शनावर प्रतिबंध लावण्यासोबतच कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. शहरात कलम 144 लागू करण्यात आले असून आता कोणत्याही रॅली, धरणे यामध्ये 5 पेक्षा जास्त लोक सार्वजनिक ठिकाणी नसतील. तसेच हत्यार प्रदर्शनावर रोख लावण्यात आली आहे.

Balochistan Protest : हक दो तहरीक (HDT) या संघटनेकडून गेल्या दोन महिन्यापासून स्थानिक मच्छिमारांच्या अधिकारासाठी लढा देत आहे. मौलाना हिदायतूर रहमान यांच्या नेतृत्वात हे विरोध प्रदर्शन केले जात होते. सरकारने स्थानिक मच्छीमारांच्या जागी मशिनीकृत नौकांच्या माध्यमातून अवैध पद्धतीने मासेमारीच्या विरोधात प्रदर्शन करत आहे. आंदोलकांचे म्हणणे आहे. स्थानीय मच्छीमारांचा मासेमारी हा पीढिजात व्यवसाय आहे. त्यावर त्यांची आजिविका चालते.

सुरुवातीला हे विरोध प्रदर्शन शांतीपूर्ण मार्गाने केले जात होते. मात्र या आठवड्यात मंगळवारी याला हिंसक वळण लागले. पोलिसांनी प्रदर्शन करणा-यांना थांबवायचा प्रयत्न केल्याने आंदोलनाला हिंसक वळण लागले. याबाबत पोलिस प्रवक्ता अस्लम खान याने सांगितले की हाशमी चौकात प्रदर्शनादरम्याने हिंस भडकल्यानंतर एक कॉन्स्टेबल यासिर यांच्या गळ्याला गोळी लागून त्याचा मृत्यू झाला.

Balochistan Protest : विरोधाचे काहीच कारण नाही – मीर जियाउल्लाह लैंगोव

याप्रकरणी बलुचिस्तानचे गृह मंत्री मीर जियाउल्लाह लैंगोव यांनी म्हटले आहे की प्रांतीय सरकार ने यापूर्वीच एचडीटीच्या मागण्यांना स्वीकार केल्या आहे. त्यामुळे विरोधाचे काहीच कारण नाही.

हे ही वाचा :

समृद्धी महामार्ग : समृद्धी महामार्गावरील वेगावर येणार नियंत्रण, अपघात रोखण्यासाठी बसवणार ‘स्पीड गन’

Engagement ring : 21 वर्षांनंतर सापडली साखरपुड्याची अंगठी!

Back to top button