Genome Sequencing : जिनोम सिक्वेंसिंग म्हणजे नेमके काय? | पुढारी

Genome Sequencing : जिनोम सिक्वेंसिंग म्हणजे नेमके काय?

पुढारी ऑनलाइन डेस्क : Genome Sequencing : चीनमध्ये कोरोना व्हायरसचा पुन्हा उद्रेक झाला आहे. लाखो लोकांचा मृत्य झाल्याची माहिती असून अंत्यसंस्कारासाठी प्रेतांच्या रांगा लागल्याची परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर भारतात कोरोनाविषयी खबरदारीचा उपाय म्हणून सरकारने पावले उचलायला सुरुवात केली आहे. नुकतेच केंद्र सरकारकडून सर्व राज्यांना कोरोनाच्या जिनोम सिक्वेंसिंगचे आदेश देण्यात आले आहे. जाणून घेऊ या जिनोम सिक्वेंसिंग नेमके काय आहे.

Genome Sequencing : जिनोम सिक्वेंसिंग काय आहे?

मानवाच्या पेशींमध्ये अनुवांशिक पदार्थ असतो. ज्याला आपन डीएनए, आरएनए असे म्हणतो. या सर्व पदार्थांना सामूहिक रुपात जिनोम असे म्हटले जाते. त्याचप्रमाणे एखाद्या व्हायरसबाबत जेव्हा त्याची रचना, तो कसा दिसतो, त्याचा स्वभाव काय आहे ही सर्व माहिती ज्या प्रक्रियेच्या माध्यमातून काढतो त्याला जिनोम सिक्वेंसिंग म्हणतात. थोडक्यात एक प्रकारे वायरसचा संपूर्ण बायोडाटा काढणे म्हणजे जीनोम सिक्वेंसिंग होय.

Genome Sequencing : या प्रक्रियेच्या माध्यमातूनच कोरोनाचे जुने आणि नवीन सर्व व्हेरियंट बाबत माहिती मिळते. कोरोनाचा व्हायरस आपले स्वरुप बदलून ओमायक्रॉन, डेल्टाक्रॉन कसा बनतो. ही माहिती देखील मिळवली जातो. व्हायरसच्या अशा विशाल समूहालाच जीनोम म्हटले जाते.

Genome Sequencing : देशात या ठिकाणी आहेत जीनोम सिक्वेंसिंगची सुविधा

आयसीएमआर-नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ वायरोलॉजी (पुणे), सीएसआईआर-आर्कियोलॉजी फॉर सेल्युलर एंड मॉलिक्यूलर बायोलॉजी (हैदराबाद), इन्स्टीट्यूट ऑफ जीनोमिक्स एंड इंटीग्रेटिव बायोलॉजी (नई दिल्ली), डीबीटी-इंस्टीट्यू ऑफ लाइफ, साइंसेज (भूवनेश्वर), डीबीटी-इन-स्टेम-एनसीबीएस (बेंगलुरू) डीबीटी- नॅशनल इंन्स्टीस्ट्यूट ऑफ बायोमेडिकल जीनोमिक्स (NIBMG), (कल्याणी, पश्चिम बंगाल), अशा मोजक्या ठिकाणी व्हारयसच्या जीनोम सिक्वेंसिंगच्या प्रयोगशाळा आहेत.

हे ही वाचा :

कोरोना : चीनमध्ये नेमके काय चुकले? झीरो कोव्हिड पॉलिसी का फसली? Why Covid Cases Rising in China?

Corona Virus : कोरोनाशी लढताना सर्वांनी राजकारण बाजूला ठेवण्याची गरज : अजित पवार

Back to top button