‘Wedding Ring’ निवडताय ? या टिप्स जरूर तुमच्या उपयोगी पडतील

‘Wedding Ring’ निवडताय ? या टिप्स जरूर तुमच्या उपयोगी पडतील
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : सध्या लग्नसराईचा सीझन अगदी जोरात सुरू आहे. अलीकडच्या काळात लग्न हा एक इव्हेंट झाला आहे. प्रत्येकजण आपल्या स्पेशल दिवसासाठी काहीना काही प्लान करतच असतो. लग्नाच्या आधीचा महत्त्वाचा सोहळा म्हणजे साखरपुडा. लग्नाच्या पूर्वी नात्याची निश्चिती या सोहळ्याने केली जाते. साखरपुडा सोहळ्यातील महत्त्वाची बाब म्हणजे साखरपुड्याची अंगठी. काही वर्षांपूर्वी केवळ दागिना म्हणून परिचित असलेली वेडिंग रिंग आता स्टाईल स्टेटमेंट बनते आहे. चिरंतन नात्याचं प्रतीक म्हणून परिधान केली जाणारी अंगठी खास असावी असं प्रत्येकालाच वाटत असतं.

तुम्हीही या वेडिंग सीझनमध्ये स्पेशल अंगठीच्या शोधात असाल तर या टिप्स तुमच्या खूप उपयोगी पडतील यात शंका नाही.

गोल्ड बॅण्ड्स : सगळ्यात बेसिक पण स्टायलिश प्रकार म्हणून या रिंग्सकडे पाहिलं जातं . यामध्ये तुम्ही वेगवेगळे डिझाईन करून घेऊ शकता. याशिवाय तुमच्या पार्टनरचं इनिशिअलही या रिंग्सवर बनवून घेऊ शकतात. यावर डायमंड सेटकरून खास टच देणं शक्य आहे.

टेंपल बॅण्ड्स : सध्या सोशल मीडियावर टेंपल ज्वेलरी ट्रेंड करते आहे. यामध्ये आता वधूसह वराचीही या टेंपल रिंग्सना पसंती मिळते आहे. यामध्ये इष्टदेवतेचा फोटो किंवा शुभ चिन्ह असलेले कपल बॅण्ड्स पसंतीस उतरत आहेत.

जेमस्टोन बॅण्ड्स : टिपिकल पण पारंपरिक लुक देणारा हा टाइप आहे. जेमस्टोन आणि प्लेन रिंग हे सगळ्यात क्लासिक कॉम्बिनेशन आहे. याशिवाय वधू आणि वराच्या राशीनुसार हे स्टोन निवडण्याला पसंती दिली जाते.

डबल टोन : डबल टोन मध्ये तुम्ही सोन्यासोबत इतर धातूच कॉम्बिनेशन करू शकता. यामध्ये गोल्ड आणि व्हाईट गोल्ड हे दोन टोन ट्रेंडमध्ये आहेत.

लेयर्स बॅण्ड्स : सध्या हा प्रकार देखील ट्रेंडमध्ये आहे. बेसिक बॅण्ड आणि त्यासोबत विविध लेयर्स हे देखील स्टायलिश कॉम्बिनेशन बनू शकतं.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news