400 कोटींचा घोटाळा; खडसेंची चौकशी होणार : मंत्री विखे पाटील

400 कोटींचा घोटाळा; खडसेंची चौकशी होणार : मंत्री विखे पाटील

जळगाव; पुढारी वृत्तसेवा :  आमदार एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्या नावे असणार्‍या 33 हेक्टर 41 आर जमिनीवरून उत्खनन करून 400 कोटींचा घोटाळा करण्यात आल्याचा आरोप आज मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून केली आहे.

दरम्यान, याप्रकरणी खडसे यांची महसूल खात्यामार्फत चौकशी केली जाईल, अशी घोषणा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली आहे. आ. चंदद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत मुक्ताईनगर तालुक्यातल्या सातोड शिवारातील 33 हेक्टर 41 आर जमिनीतून करण्यात आलेल्या त्खननाचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, मंदाकिनी खडसे यांच्या नावाने सातोड शिवारात 33 हेक्टर 41 आर जमिनीची खरेदी करण्यात आली. या जमिनीला शालेय कारणासाठी बिनशेती परवाना म्हणजेच एनए प्रदान करण्यात आली. तेथे 10 हजार ब्रासच्या उत्खननाची परवानगी होती. मात्र, येथून लाखो ब्रास मुरुमासह अन्य गौणखनिजाचे उत्खनन करण्यात आले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news