40 years of Operation Meghdoot | सियाचिन मिळवण्यासाठी राबविले होते ‘ऑपरेशन मेघदूत’; आज ४० वर्षे पूर्ण

 40 years of Operation Meghdoot
40 years of Operation Meghdoot
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : लडाखमधील जगातील सर्वात उंच युद्धभूमी सियाचीन ग्लेशियरमध्ये ऑपरेशन मेघदूतला आज (दि.१३) ४० वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने भारतीय लष्कराने एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. या माध्यमातून सियाचीन ग्लेशियरमधील ऑपरेशन मेघदूतच्या आठवणी ताज्या केल्या आहे. या संदर्भातील व्हिडिओ वृत्त एएनआयने दिले आहे. ( 40 years of Operation Meghdoot)

लडाखच्या उत्तर आणि ईशान्य भागात, अत्यंत दुर्गम आणि निर्मनुष्य अशा या टापूवर सामरिकदृष्ट्या ताबा मिळवण्यासाठी 'ऑपरेशन मेघदूत' राबवण्यात आले. या मोहिमेस आज १३ एप्रिल रोजी ४० वर्षे पूर्ण होत आहेत. जगातील सर्वात उंच युद्धभूमीवर झालेली ही पहिलीच लष्करी मोहीम ठरली होती. फारशी तयारी नसताना देखील भारतीय सैन्याने सियाचिन या जगातील सर्वात उंच युद्धभूमीवर ताबा मिळवून पाकिस्तानला बेसावध केले होते. ( 40 years of Operation Meghdoot)

ऑपरेशन मेघदूत हे लडाखमधील सियाचीन ग्लेशियरवर संपूर्ण नियंत्रण मिळवण्यासाठी भारतीय लष्कराच्या ऑपरेशनचे सांकेतिक नाव होते. १३ एप्रिल १९८४ रोजी पहाटे जगातील सर्वात उंच रणभूमीवर मेघदूत हे अशा प्रकारचे पहिले लष्करी आक्रमण होते. या कारवाईने पाकिस्तानच्या ऑपरेशन अबाबीलला पूर्वपदावर आणले; आणि यशस्वी झाले. परिणामी भारतीय सैन्याने सियाचीन ग्लेशियरवर संपूर्ण नियंत्रण मिळवले. सध्या, भारतीय सैन्य हे जगातील पहिले आणि एकमेव सैन्य आहे ज्याने ५ हजार मीटरपेक्षा जास्त उंचीवर टाक्या आणि इतर जड शस्त्रास्त्रे तैनात केली आहेत. सध्याच्या सियाचीन संघर्षामुळे संपूर्ण प्रदेशात ६,४०० मीटर उंचीवर भारतीय लष्कर आणि पाकिस्तानी लष्कराच्या प्रत्येकी दहा पायदळ बटालियन सक्रियपणे तैनात आहेत. ( 40 years of Operation Meghdoot)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news