Shraddha Murder Case : आरोपी आफताबच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ | पुढारी

Shraddha Murder Case : आरोपी आफताबच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ

पुढारी ऑनलाइन डेस्क : Shraddha Murder Case : दिल्लीतील साकेत न्यायालयाने आरोपी आफताब पूनावालाच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ केली आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्याला आज न्यायालयापुढे हजर करण्यात आले. दिल्ली पोलिसांनी न्यायालयीन कोठडी वाढवण्याची मागणी केली आणि तपास सुरू असल्याचे सादर केले.

Shraddha Murder Case : आरोपी आफताब पूनावाला यावर प्रेयसी श्रद्धा हिचा गळा दाबून खून करून नंतर त्याचे 35 तुकडे करून हे तुकडे दिल्लीतील विविध भागात फेकून देऊन त्याची विल्हेवाट लावल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे दिल्लीच नव्हे तर संपूर्ण देश हादरला आहे.

Shraddha Murder Case : दरम्यान, आफताबला अटक केल्यानंतर खुनाचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी पोलीस पुरावे गोळा करत आहेत. यासाठी आफताबच्या आतापर्यंत पॉलिग्राफी आणि नार्को टेस्ट करण्यात आली आहे. पॉलिग्राफी टेस्टमध्ये त्याने खुनाची कबुली दिली आहे. तसेच या चाचणीतून समोर आलेल्या माहितीतून श्रद्धाच्या शरीराचे तुकडे शोधण्यात देखील मदत होणार आहे.

आफताबवर हल्ला होण्याच्या शक्यतेने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. आफताब हा अतिशय धूर्त असला तरी लवकरच श्रद्धा हत्या प्रकरणात नवीन खुलासे होतील, असा विश्वास दिल्ली पोलिसांनी व्यक्त केला आहे. आफताबची पाचवेळा पॉलिग्राफ चाचणी तर एकदा नार्को चाचणी झाली होती. या चाचण्यांदरम्यान त्याने महत्वाची माहिती दिली होती. दहा दिवसांपूर्वी पॉलिग्राफ चाचणीसाठी घेउन जात असताना काही लोकांनी आफताबवर हल्ला केला होता. त्यानंतर त्याच्या भोवतीच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलेली आहे.

हे ही वाचा :

Cyclone Mandos Update : ‘मंदोस’ चक्रीवादळ आज धडकणार; या ठिकाणी ऑरेंज अलर्ट   

Shraddha murder case : आरोपी आफताबची नार्को चाचणी पूर्ण

Back to top button