Digital Economy : तिस-या तिमाहीत 38.32 लाख कोटींचे डिजिटल व्यवहार, यूपीआय पेमेंटला सगळ्यात जास्त पसंती

Digital Economy : तिस-या तिमाहीत 38.32 लाख कोटींचे डिजिटल व्यवहार, यूपीआय पेमेंटला सगळ्यात जास्त पसंती
Published on
Updated on

पुढारी ऑनलाइन डेस्क : Digital Economy : भारतात डिजिटल अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे. सरकारचे प्रयत्न आणि उत्तम सुविधा यामुळे डिजिटल व्यवहारांमध्ये मोठी वाढ झाली आहे. 2022 च्या तिस-या तिमाहीत म्हणजेच जुलै ते सप्टेंबर या काळात देशात 38.32 लाख कोटी रुपयांचे व्यवहार होत आहे. तर एकूण 23.06 अब्ज डिजिटल लेनदेन झाले आहे. यामध्ये यूपीआय पेमेंटला लोकांनी सर्वाधिक पसंती दिल्याचे दिसते. एकूण डिजिटल व्यवहारात 84 टक्के पेमेंट हे यूपीआई ने झाले आहे. वर्ल्डलाइन ने या संबंधीचा अहवाल दिला आहे.

Digital Economy : अहवालानुसार, 2022 च्या तिस-या तिमाहीत 19.65 अब्ज पेक्षा जास्त व्यवहारांमध्ये 32.5 लाख कोटी रुपयांचे लेनदेन झाले. डिजिटल व्वहारात यूपीआय, डेबिट-क्रेडिट कार्ड, मोबाईल वॉलेट असे प्रीपेड पेमेंट, प्रीपेड कार्ड आदि गोष्टींचा समावेश आहे. यापैकी लोकांनी यूपीआय पेमेंटला सर्वात जास्त पसंती दिली. एकूण डिजिटल व्यवहरांच्या 84 टक्के पेमेंट हे यूपीआयने केले आहे. तुलना केली तर या तिमाहीत यूपीआय पेमेंट लेनदेनच्या बाबतीत 88 टक्के तर मूल्याप्रमाणे 71 टक्के इतकी वाढ झाली आहे. यामध्ये पर्सन टू मर्चेंट आणि पर्सन टू पर्सन दोन्ही प्रकारांमध्ये लेनदेन जवळपास समसमान झाले आहे.

Digital Economy : एकूण 358 बँकांकडून यूपीआयची सुविधा

देशात सध्या एकूण 358 बँका यूपीआयची सुविधा देतात. मात्र, सर्वात जास्त भूगतान एसबीआय, एचडीएफसी बँक, बँक ऑफ बडोदा, यूनियन बँक आणि आईसीआईसीआई बँकेतून झाले आहे. तर फोन पे, गुगल पे, पेटीएम पेमेंट्स बँक या अॅपचा सर्वात जास्त उपयोग

Digital Economy : क्रेडिट आणि डेबिट कार्डचे व्यवहार 1.01 अब्ज सर्क्यूलेशन

जुलै ते सप्टेंबरपर्यंतच्या कालावधीत 1.01 अब्ज क्रेडिट-डेबिट कार्डचे सर्कुलेशन झाले आहे. या दरम्यान क्रेडिट कार्डची संख्या वार्षिक आधारावर 19 टक्के वाढून 7.77 टक्के कोटीपर्यंत पोहोचली आहे. डेबिट कार्डची संख्या 92.03 कोटींवरून 93.85 कोटींवर पोहोचली आहे. अर्थात यामध्ये 2 टक्के वाढ झाली आहे.

Digital Economy : क्रेडिट-डेबिट कार्डने एकूण देवाण-घेवाण व्यवहार संख्येप्रमाणे 7 टक्के तर मूल्याच्या हिशोबाने 14 टक्के झाले आहे. क्रेडिट कार्डने 3.5 लाख कोटी रुपयांचे 7.25 कोटी देवाण-घेवाण नोंदवले गेले डेबिट कार्डने 90.7 कोटी देवाण-घेवाणीत 1.88 लाख कोटी रुपयांची देवाण-घेवाण झाली.

याव्यतिरिक्त मोबाइल वॉलेटने 1.44 अब्ज लेनदेन मध्ये 551.8 अब्ज डॉलरची देवाण घेवाण झाली. या व्यवहारात 19 टक्के वाढ झाली आहे. तर मूल्याच्या हिशोबाने पाहिले तर 9 टक्के घटले आहे.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news