धक्कादायक ! बहिणीच्या घरी सोडतो म्हणत गाडीत बसवून उच्चशिक्षित तरुणीवर बलात्कार | पुढारी

धक्कादायक ! बहिणीच्या घरी सोडतो म्हणत गाडीत बसवून उच्चशिक्षित तरुणीवर बलात्कार

राजगुरुनगर, पुढारी वृत्तसेवा: बहिणीच्या घरी चारचाकीतून सोडतो, असे म्हणत तरुणीला घेऊन जात आडबाजूला नेऊन त्याच गाडीत तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार बुधवार ३० नोव्हेंबर रोजी घडला आहे. या बाबत संशयित विकास ज्ञानेश्वर गुरव (वय ३४, रा. खंडोबावस्ती कडधे, ता. खेड) याला खेड पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे. पीडित तरुणीने त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी उच्च शिक्षण घेत आहे. पीडित तरुणीला बहिणीकडे जायचे होते. याची माहिती मिळाल्यानंतर आरोपीने स्विफ्ट गाडीतून सोडतो, असे सांगून तरुणीला तो घरापासून घेऊन गेला. लगतच्या गावाच्या दिशेला जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर त्याने गाडी थांबवली. गाडीमध्ये तरुणीवर जबरदस्तीने बलात्कार केला. या घटनेबाबत घरी कोणालाही काही सांगू नको, अशी धमकीदेखील त्याने पीडित तरुणीला दिली. या घटनेचा तपास महिला पोलिस उपनिरीक्षक वर्षाराणी घाटे करीत आहेत.

Back to top button