अर्जेंटिना बाद फेरीत पोलंडवर २-० ने मात | पुढारी

अर्जेंटिना बाद फेरीत पोलंडवर २-० ने मात

दोहा : लेक्सिस मॅक लिस्टर आणि ज्युलियन अल्वारेझ यांनी मिळालेल्या संधीचे सोने केले अन् रसिकांना उत्कंठा लागून राहिलेल्या लढतीत लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटिनाला बाद फेरीत नेले. ग्रुप ‘सी’मधील पोलंडविरुद्ध अर्जेंटिना यांच्यातील महत्वाच्या लढतीकडे जगभरातील फुटबॉलप्रेमींचे लक्ष लागले होते. बुधवारी मध्यरात्री पार पडलेल्या या सामन्यात जिगरबाज पोलंडने अर्जेंटिनाला कडवा प्रतिकार केला. हा सामना अर्जेंटिनाने २-० असा जिंकला.

खरेतर अर्जेंटिनाला पेनल्टी किकसारखी सुवर्णसंधी चालून आली होती. मेस्सी त्यासाठी सज्ज होता. त्याने नेहमीच्या शैलीत सणसणीत फटका लगावला. पण, हाय रे दैवा. पोलंडच्या गोलरक्षकाने हवेत सूर मारून चेंडूला बाहेरची दिशा दाखवली आणि अर्जेंटिनाच्या गोटात सन्नाटा पसरला. मात्र, त्यानंतर अर्जेंटिनाने डोळ्यांचे पारणे फेडणारा खेळ केला.

Back to top button