

पुढारी ऑनलाइन डेस्क : Twitter : एलॉन मस्क आज सोमवारी (दि. 21) आणखी काही कर्मचा-यांना कमी करू शकतात. त्या दृष्टीने मस्क यांचा विचार सुरू आहे. ज्या कर्मचा-यांना कमी केले जाणार आहे त्यांना आज दुपारनंतर किंवा संध्याकाळी उशिरापर्यंत ई-मेल प्राप्त होऊ शकतात. ब्लूमबर्गच्या हवाल्याने इंडिया टुडेने याचे वृत्त दिले आहे.
Twitter : दिलेल्या वृत्तानुसार, विक्री विभाग आणि भागीदारीमधील कर्मचा-यांच्या नोकरीवर आज कु-हाड कोसळू शकतो. आज दुपारी किंवा संध्याकाळी उशिरापर्यंत त्यांना कामावरून कमी केल्याचे मेले येऊ शकतात.
Twitter : एलॉन मस्कने ट्विटरचा ताबा मिळवल्यानंतर ट्विटर हे मोठ्या नवनवीन स्थित्यंतरातून जात आहे. मस्क यांनी यापूर्वीच ट्विटरच्या एकूण कर्मचा-यांपैकी जवळपास निम्म्या कर्मचा-यांना कमी केले. कामावरून काढून टाकण्याची सुरुवात त्यांनी ट्विटरचे माजी सीईओ पराग अगरवाल यांच्यापासून केली. मस्कने ताबा घेताच पराग अगरवाल सह अन्य उच्च पदाधिका-यांचा राजीनामा घेतला. त्यानंतर आठवडाभरातच खर्च कमी करण्याचे कारण देत जवळपास 50 टक्के कर्मचा-यांना कामावरून कमी केले. मात्र, यापैकी काही मोजक्या कर्मचा-यांना आपली चूक झाली असे म्हणत पुन्हा ट्विटरमध्ये नियुक्त केले.
Twitter : यानंतर ट्विटरच्या कार्यसंस्कृतीत बदल करत एलन मस्कने मोठे बदल केले. तसेच उरलेल्या कर्मचा-यांचे दिवसभरातील कामाचे तास वाढवले. तसेच मान्य नसल्यास राजीनामा देण्यास सांगितले. परिणामी ट्वटिरच्या अनेक कर्मचा-यांनी स्वतःहून राजीनामे दिले. ट्विटरमध्ये आधीच मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या किती कर्मचारी कंपनीत कार्यरत आहेत. हे निश्चित सांगता येत नसले तरी दोन ते तीन हजार कर्मचारी सध्या कार्यरत आहे.
त्यापैकी आज विक्री विभाग आणि भागीदारीत काम करणा-या कर्मचा-यांना कमी करण्यात येण्याची शक्यता आहे. त्यांना तसा ई-मेल आज सायंकाळी उशिरापर्यंत येऊ शकतो.
Twitter : कर्मचारी कपाती व्यतिरिक्त मस्कने ट्विटरमध्ये देखिल अनेक बदल केले आहेत.ट्विटर ब्ल्यू टिक साठी सत्यापित सदस्यांसकडून शूल्क आकरण्याची योजना जाहीर केली होती. तर ट्विटर ब्लू प्लॅन असलेल्या वापरकर्त्यांना कंपनीचे सदस्यत्व त्यांच्या प्रोफाईल वर स्वयंचलितपणे ब्ल्यू बॅज मिळेल. इत्यादी. या व्यतिरिक्त ट्विटर वर लवकरच मॉनिटायजेशनची सुविधा देण्याची योजना देखिल आखत आहे. नुकतेच त्यांनी ट्विटरवर अनिश्चित काळासाठी निलंबित केलेले अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे खाते पुन्हा सुरू केले. यासाठी मस्क यांनी लोकांकडून मते मागविली होती.
हे ही वाचा :