पेणच्या भोगावती नदीपात्रात स्फोटके सापडल्याने खळबळ, परिसरात भीती | पुढारी

पेणच्या भोगावती नदीपात्रात स्फोटके सापडल्याने खळबळ, परिसरात भीती

पेण ; पुढारी वृत्‍तसेवा पेण शहरातून वाहणारी व महामार्गाला छेदून जाणाऱ्या भोगावती नदी पात्रात गुरुवारच्या सायंकाळी जिलेटीन व वायर सदृश्य वस्तू सापडल्याने खळबळ उडाली. मात्र वेळीच पोलिसांनी घटनास्थळी ताबा मिळवून तपास सुरू केला.

याबाबतचे वृत्त पेण पोलीस, वढखल पोलीस व दादर सागरी पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तर घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, प्रांत अधिकारी यांच्यासह बॉम्ब शोधक व बॉम्ब प्रतिरोधक पथकासह भोगावती नदी पात्राजवळ रात्री उशिरा दाखल झाले.

पोलिसांना निनावी माहितीच्या आधारे जिलेटिनच्या अनेक कांड्या, तसेच इलेक्ट्रिकच्या वायरी गुंडाळलेल्या स्थितीतस्‍फोटके पाण्यात आढळून आली. त्वरित बॉम्ब शोधक व रोधक पथकास बोलावण्यात आले. यानंतर रात्री नऊ पर्यंत पथके दाखल झाली.

मात्र, ही स्फोटके आहेत की बॉम्ब सदृश्य वस्तू आहेत, ही कोणी टाकली की, जाणाऱ्या वाहनधारकाने येथे टाकली याबाबतचा तपास रात्रभर सुरू होता. सुरक्षेच्या कारणास्‍तव पोलिसांनी यावेळी नदीच्या पुलावरील वाहतूक काही वेळ रोखली होती. त्यानंतर एकेरी वाहतूक रात्री सुरू ठेवली होती. मात्र या स्फोटकामुळे पेण शहर व परिसरात घबराट पसरली होती.

हेही वाचा :  

Back to top button