साई रिसॉर्ट प्रकरणी माजी मंत्री अनिल परब यांना अंतरिम जामीन मंजूर | पुढारी

साई रिसॉर्ट प्रकरणी माजी मंत्री अनिल परब यांना अंतरिम जामीन मंजूर

खेड; पुढारी वृत्तसेवा : रत्नागिरी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि माजी परिवहन मंत्री अनिल परब यांना साई रिसॉर्ट प्रकरणी मंगळवार दि. ८ रोजी खेड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला.

दापोली येथील गटविकास अधिकारी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दापोली पोलीस ठाण्यात सोमवारी दि. ७ रोजी साई रिसॉर्ट प्रकरणी माजी मंत्री अनिल परब यांच्या गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार मंगळवारी दि. ८ रोजी अनिल परब यांचे तर्फे वकील सुधीर बुटाला यांनी खेड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्यानंतर त्यांनी केलेल्या युक्तिवादानंतर माजी मंत्री अनिल परब यांना न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. पुढील तारीख १४ डिसेंबर देण्यात आली आहे.

Back to top button