Pathaan : शाहरुखच्या 'पठान'चा सीक्वल लवकरच; टीझरवर मीम्सचा पाऊस | पुढारी

Pathaan : शाहरुखच्या 'पठान'चा सीक्वल लवकरच; टीझरवर मीम्सचा पाऊस

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने त्याचा वाढदिवस २ नोव्हेबर रोजी धुमधडाक्यात साजरा केला आहे. त्याने मुंबईतील मन्नतचा बाल्कनीपासून ते किगंडमच्या स्टेज परफार्मपर्यतच्या फॅन्सनी भरभरून शुभेच्छा दिल्या. तर देशातील बुर्ज खलिफावर देखील शाहरूखचे पोस्टर झळकले. परंतु, शाहरूखच्या पठानच्या ( Pathaan )  टीझरवर भरभरून कौतुक करताना मीम्सचा पाऊस पडला आहे. याच दरम्यान शाहरूखने तिचा पठान चित्रपटाचा सीक्कल लवकरच येत असल्याची माहिती दिली आहे.

शाहरुखने त्याच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आगामी पठान ( Pathaan ) चित्रपटाचा एक धमाकेदार टिझर रिलीज केला आहे. यात त्याच्या अॅक्शन सीनसोबत फायरिंग दाखवण्यात आली आहे. याच्या कॅप्शनमध्ये शाहरूखने लिहिले आहे की, ‘तुमच्या खुर्चीचा पट्टा बांधा. #PathaanTeaser आऊट! ५ जानेवारी २०२३ रोजी तुमच्या जवळच्या मोठ्या स्क्रीनवर #Pathan साजरा करा. हिंदी, तमिळ आणि तेलुगुमध्ये रिलीज होत आहे. असे लिहिले आहे. यावरून शाहरूखच्या पणान हा चित्रपट पुढच्या वर्षी म्हणजे, ५ जानेवारी २०२३ रोजी चाहत्याच्या भेटीस येत आहे. या चित्रपटातून जवळपास चार वर्षानंतर साहरूख पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.

पंरतु, हा व्हिडि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच काही चाहत्याना पसंतीस उतरला आहे. तर काही चाहत्यांना अजिबात आवडला नसल्याने त्याची खिल्ली उडवत आहेत. टीझरच्या शेवटी शाहरुखचा हवेत उडतानाचा एक सीन आहे. या सीनला सोशल मीडिया यूजर्संनी ‘हॉलिवूडची कॉपी’ केली असल्याचे म्हटलं आहे. इतकंच नाही तर काहींनी हृतिक रोशनच्या ‘वॉर’ या चित्रपटाशी तुलना करण्यास सुरुवात केली आहे. याच दरम्यान त्याच्यावर फनी मीम्सचा पाऊस पडत आहे.

याच दरम्यान शाहरुखने त्याच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत एका खास फॅन इव्हेंटमध्ये हजेरी लावून सर्व चाहत्यांचे आभार मानले. यावेळी बोलताना तो म्हणाला की, ‘तुम्ही प्रार्थना करा की पठाणचा सीक्वल बनवला जावा. मला आशा आहे की, सर्वांना पठाण आवडेल. चित्रपटासाठी आम्ही सर्वांनी खूप मेहनत घेतली आहे. यामुळे तुम्ही चित्रपटावर भरभरून प्रेम करा, त्यामुळे लवकरच त्याचा सीक्कल येईल.’ काही दिवसांपूर्वीच ‘पठाण’ चा सीक्वल येत असल्याची वृत्त समोर येत होते, मात्र त्यावर अद्याप कोणतेही अधिकृत घोषमा केलेली नव्हती. शाहरुखच्या या इशाऱ्यानंतर ‘पठाण’ चा सीक्वल नक्कीच बनणार असल्याचे वाटत आहे.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

 

View this post on Instagram

 

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

 

View this post on Instagram

 

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

Back to top button