उरुळी कांचन येथून ओढ्यात वाहून गेलेल्या प्रशांत डोंबाळे यांचा मृतदेह सापडला | पुढारी

उरुळी कांचन येथून ओढ्यात वाहून गेलेल्या प्रशांत डोंबाळे यांचा मृतदेह सापडला

उरुळी कांचन : पुढारी वृत्तसेवा : उरुळी कांचन(ता.हवेली) शहरातील ओढ्याला आलेल्या पुरात वाहून गेलेल्या प्रशांत डोंबाळे यांचा मृतदेह खामगाव टेक (ता. दौंड) येथे गुरुवारी (दि.२०) दुपारच्या सुमारास आढळला आहे. उरुळी कांचन(ता.हवेली) शहरातील ओढ्याला आलेल्या पुरात वाहून गेलेल्या प्रशांत डोंबाळे यांचा मृतदेह खामगाव टेक (ता. दौंड) येथे गुरुवारी (दि.२०) दुपारच्या सुमारास आढळला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील तीन दिवसापासून उरुळी कांचनसह परिसरात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे, नदी नाले व ओढ्यांना पूर आले आहेत. उरुळी कांचन भवरापूर या गावांदरम्यान असणाऱ्या पुलारून प्रशांत डोंबाळे हे त्यांच्या दुचाकीवरून मंगळवारी (दि. १८) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास चालले होते. तेव्हा डोंबाळे यांना तुटका महादेव मार्गावरील ओढ्यातील पुराचा अंदाज न आल्याने ते मोटारसायकलसहित पुलावरून खाली पडले. तर त्यांची दुचाकी पुलाच्या नळीमध्ये अडकली. मात्र ते पुरामध्ये वाहून गेले होते.

या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस व उरुळी कांचन ग्रामपंचायत प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जेसीबी मशीनच्या सहाय्याने घटनास्थळावरून दुचाकी बाहेर काढण्यात आली. मात्र प्रशांत डोंबाळे हे आढळून आले नाहीत. लोणी काळभोर पोलीस त्यांचा शोध घेत होते.

दरम्यान, खामगाव टेक येथील काही नागरिकांना ओढ्यातून एक मृतदेह वाहून जात असल्याचे आढळून आले. नागरिकांनी याबाबत त्वरित यवत पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी तातडीने घटनास्थळी पोलिसांना पाठविले. पोलिसांनी ओढ्यातून मृतदेह बाहेर काढला आहे. आणि तो मृतदेह प्रशांत डोंबाळे याचा असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील तीन दिवसापासून उरुळी कांचनसह परिसरात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे, नदी नाले व ओढ्यांना पूर आले आहेत. उरुळी कांचन भवरापूर या गावांदरम्यान असणाऱ्या पुलारून प्रशांत डोंबाळे हे त्यांच्या दुचाकीवरून मंगळवारी (दि. १८) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास चालले होते. तेव्हा डोंबाळे यांना तुटका महादेव मार्गावरील ओढ्यातील पुराचा अंदाज न आल्याने ते मोटारसायकलसहित पुलावरून खाली पडले. तर त्यांची दुचाकी पुलाच्या नळीमध्ये अडकली. मात्र ते पुरामध्ये वाहून गेले होते.

या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस व उरुळी कांचन ग्रामपंचायत प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जेसीबी मशीनच्या सहाय्याने घटनास्थळावरून दुचाकी बाहेर काढण्यात आली. मात्र प्रशांत डोंबाळे हे आढळून आले नाहीत. लोणी काळभोर पोलीस त्यांचा शोध घेत होते.

दरम्यान, खामगाव टेक येथील काही नागरिकांना ओढ्यातून एक मृतदेह वाहून जात असल्याचे आढळून आले. नागरिकांनी याबाबत त्वरित यवत पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी तातडीने घटनास्थळी पोलिसांना पाठविले. पोलिसांनी ओढ्यातून मृतदेह बाहेर काढला आहे.

Back to top button