Diwali Special Recipe : अशी बनवा खुसखुशीत, रूचकर आणि चविष्ठ करंजी | पुढारी

Diwali Special Recipe : अशी बनवा खुसखुशीत, रूचकर आणि चविष्ठ करंजी

पुढारी ऑनलाईन : करंजी हा परंपरागत चालत आलेला, घरोघरी बनविला जाणारा फराळाचा पदार्थ आहे. दिवाळीच्या सणाचे (Diwali Special Recipe) पदार्थ बनवण्याचा घाटही करंज्या बनवण्यापासूनच घातला जातो. करंजी हा दिवाळी पदार्थामधील सर्वात महत्त्वाचा पदार्थ आहे. पण करंज्या बनवताना त्या खुसखुशीत, रूचकर आणि चविष्ठ कशा बनवायच्या अशी अडचण गृहिणींपुढे निर्माण होते. चला तर मग पाहूया कशी बनवायची खुसखुशीत, चविष्ठ करंजी.

Diwali Special Recipe: करंजीसाठी लागणारे साहित्य

आवरणासाठी

• १ कप मैदा (तुम्ही हे प्रमाण किलोमध्येही घेऊ शकता)
• १/४ कप बारीक रवा/सूजी
• चवीनूसार मीठ
• २ चमचे तेल
• दूध

स्टफिंगसाठी

• १ टीस्पून खसखस
• १ चमचा बारीक रवा
• १/२ कप किसलेले कोरडे खोबरे
• १/४ कप पिठीसाखर
• वेलची पावडर
• सुका मेवा (तुमच्या आवडीचा)

साठ्यासाठी

• 1 टीस्पून तूप
• २ चमचे कॉर्न फ्लोअर

• करंजी तळण्यासाठी तेल

कृती:

आवरणासाठी

• एका ताटात मैदा घ्या. त्यामध्ये पाव कप बारीक रवा आणि चवीसाठी चिमूठभर मीठ घाला. यामध्ये तुमच्या आवडीनुसार, दोन चमचे थंड किंवा गरम तेल टाका.
• यानंतर रवा, मैदा आणि तेल हे व्यवस्थित हाताने मिसळून घ्या.
• या मिश्रणात थोडे थोडे दूध घालून, त्याचे घट्ट पीठ बनवा आणि गोळा तयार करा. हा तयार झालेला गोळा एक तासभर झाकून ठेवा.

स्टफिंगसाठी सारण

• मध्यम आचेवर पॅन गरम करा. यामध्ये खसखस टाका आणि ही मंद आचेवर ३ ते ४ मिनिटे तांबूस रेग येईपर्यंत भाजून घ्या आणि ते एका भांड्यात काढून घ्या.
• त्यानंतर पॅनमध्ये रवा घालून तो देखील मंद आचेवर ४-५ मिनिटे भाजून घ्या. हा भाजलेला रवा खसखस काढलेल्या भांड्यात ओता.
• हे मिश्रण थंड झाल्यावर त्यात किसलेले कोरडे खोबरे घाला. (तुम्हाला पाहिजे असल्यास हे खोबरे तुम्ही भाजून देखील घेऊ शकता)
• त्यानंतर यामध्ये पिठीसाखर, वेलची पावडर, चवीनुसार मीठ आणि ड्रायफ्रुट्स घाला. या नंतर हे मिश्रण चांगल्याप्रकारे मिसळून घ्या.
• करंजीत स्टफिंगसाठी लागणारे सारण तयार होईल.

साठा असा तयार करा

• एका भांड्यात तूप घ्या आणि ते चांगले फेटून घ्या जेणेकरून त्यामधील रवाळ कण बारीक होतील आणि त्याला मऊपणा येईल.
• यामध्ये दोन चमचे कॉर्न फ्लॉवर घाला आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्या.
• गोळे करताना लावण्यासाठी लागणारा साठा तयार होईल.

करंजी बनवायची कृती

• भिजायला ठेवलेले करंजीचे पीठ चांगले मळून घ्या. त्याचे तीन गोळे करा आणि त्याच्या पोळ्या लाटून घ्या.
• एक पोळी घेऊन त्यावर तयार केलेले साठण लावून घ्या.
• यानंतर साठण लावलेल्या पोळीवर दुसरी लाटलेली पोळी ठेवा आणि पुन्हा यावर साठण लावा. त्यानंतर तिसरी पोळी या दोन्हींवर ठेवून हीच कृती करा.
• या तिन्ही चपात्यांचा रोल बनवा. हा रोल थोड्या थोड्या अंतरावर कापून घ्या, आणि त्याचे गोळे तयार करा. (तयार केलेले गोळे एका भांड्यात झाकूण ठेवा)
• गोळ्याच्या एक एक लाट्या करून घ्या. त्यामध्ये तयार केलेले सारण भरा. त्याच्या काठावर कापसाने दूध लावा, आणि करंजीचे काट एकमेकांवर ठेवूण ते व्यवस्थित बंद करून घ्या. (करंजी तळताना सारण बाहेर येऊ शकते त्यामुळे व्यवस्थित बंद करून गेतल्याची खात्री करा)
• करंजीचे काट डिझाईनच्या चमच्याने थोडे थोडे काढून घ्या. तयार झालेली करंजी कढलेल्या तेलात, मंद आचेवर हलका तपकिरी रंग येईपर्यत चांगली तळून घ्या.
• तळलेल्या करंज्या टिश्यू पेपरवर ठेवा म्हणजे दोन्ही बाजूंनी याला चांगले लेयरिंग येते.
• करंजी पूर्णपणे थंड झाल्यावर हवाबंद करून ठेवा.

हेही वाचा:

Back to top button