Chhagan Bhujbal : छगन भुजबळ, “सत्य परेशान हो सकता है, पराजित नही” | पुढारी

Chhagan Bhujbal : छगन भुजबळ, "सत्य परेशान हो सकता है, पराजित नही"

मुंबई, पुढारी ऑनलाईन : महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात राज्याचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. “महाराष्ट्र सदन प्रकरणात खोटे-नाटे आरोप करण्यात आले. आज ना उद्या आम्हाला न्याय मिळणारच होता. आमचा न्यायदेवतवर विश्वास आहे.आज दुखःचा पाढा वाचणार नाही. कोर्टाने मला दोषमुक्त केल्यामुळे ईडीच्या गुन्ह्यालाही काही अर्थ नाही. महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील ८०० कोटींचा आरोप खोटा होता. त्यामुळे सत्य परेशान हो सकता है, पराजीत नही हो सकता”, अशी प्रतिक्रिया राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत बोलत होते.  महाराष्ट्र सदन कथित घोटाळा प्रकरणी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) न्यायालयाकडे दोषमुक्त करण्यासाठी भुजबळांनी अर्ज दाखल केला होता. छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यासोबत त्यांचा पुतण्या समीर भुजबळ यांनीही हा अर्ज दाखल केला होता. आपल्यावर करण्यात आलले आरोप हे निराधार आहेत. त्यामुळे न्यायालयाने आपल्याला दोषमुक्त करावे असे भुजबळ यांनी म्हटले होते. त्यानंतर गुरुवारी न्यायालयाने भुजबळांची निर्दोष मुक्तता केली आहे. दरम्यान याआधीच एसीबीने याच महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणातील पाच आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे.
“न्यायालयाने दोषमुक्त केल्यानंतर भुजबळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली. भुजबळ पुढे म्हणाले की, “महाराष्ट्र सदनच्या कंत्राटदाराला अजूनही जमीन मिळालेली नाही. मला अजून काही लोक झोपू देणार नाहीत हे मला माहीत आहे. पण, माझ्या मनात कोणाबद्दलही कटुता आणि राग नाही. कठीण काळात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे मी आभार मानतो”, अशीही प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी पत्रकारांनी दिली.

Back to top button