नाशिक : शेतकऱ्याच्या डोळ्यादेखत 35 एकर उसाची राख ; शॉर्टसर्किट झाल्याने आग

नाशिक : शेतकऱ्याच्या डोळ्यादेखत 35 एकर उसाची राख ; शॉर्टसर्किट झाल्याने आग

पुढारी वृत्तसेवा :  नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यामधील सिंगवे या गावात शेतक-याचा तब्बल 35 एकरावरील उस जळून खाक झाला आहे. रामदास सानप असे नुकसान झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. महावितरणाच्या तारांचे शॉर्टसर्किट झाल्याने ही आग लागली असल्याचे समजते. शॉर्टसर्किट झाल्याने आगीची ठिणगी उसात पडली. उसाने पेट घेतला आणि अवघ्या काही मिनिटातच बघता बघता आख्खा उस जळून खाक झाला. यात शेतक-याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या दुर्घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून शेतक-याला नुकसान भरपाई मिळायला हवी अशी मागणी गावक-यांनी केली आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news