Uttarakhand Accident : व-हाडाची बस दरीत कोसळली, 25 जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता | पुढारी

Uttarakhand Accident : व-हाडाची बस दरीत कोसळली, 25 जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

पुढारी ऑनलाइन डेस्क : उत्तराखंडातील पौढी गढेवाल जिल्ह्यात बस दरीत कोसळल्याच्या दुर्घटनेत 25 जण मृत्युमूखी पडले आहे. तर मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. (Uttarakhand Accident)

उत्तराखंड राज्यातील पौढी गढेवाल जिल्ह्यात लग्नसमारंभातील ४० ते ५० लोकांना घेऊन जाणारी बस दरीमध्ये कोसळली. हा भीषण अपघात पौढी गढेवाल जिल्ह्यातील बीरोंखोल भागात घडल्याची माहिती आपत्ती नियंत्रण कक्षाने दिली आहे. या अपघात मोठी जिवीतहानी झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि आसपासच्या गावातील ग्रामस्थ शोध मोहीम राबवत आहेत. (Uttarakhand Accident)

अपघात झालेली बस वऱ्हाडीमंडळींना घेऊन लालढांग गावाकडून बीरोंखोल गावाकडे जात होती. दरम्यान वाटेत वाहन दुर्घटनाग्रस्त झाले. सायकाळी सात ते साडेसात दरम्यान हा अपघात घडला असल्याची माहिती नियंत्रण कक्षाने दिली आहे. स्थानिक लोकांच्या मदतीने बचाव कार्य सुरु असून अंधारामुळे मदतकार्यात अडचणी निर्माण होत आहे.

मोबाईल टॉर्चच्या सहाय्याने शोध घेतला जात आहे. स्थानिक रहिवाशांनी माहिती दिली की, अपघातग्रस्त ठिकाणी प्रकाश योजनेची कोणतीही सोय नाही. लोक आपल्या मोबाईलच्या टॉर्चद्वारे बसमध्ये अडकलेल्या लोकांचा शोध घेत आहे. या अपघात मोठी जिवीतहानी होण्याची शक्यता अधिक आहे. महत्त्वाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पुढील माहितीची सर्वजण वाट पहात आहेत. (Uttarakhand Accident)

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर, मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि शोध आणि बचाव कार्यावर लक्ष ठेवण्यासाठी सचिवालयातील एसईओसी नियंत्रण कक्षात पोहोचले.

“राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) च्या टीम्स एकत्रित केल्या आहेत आणि अपघातस्थळी रवाना झाल्या आहेत. आम्ही लोकांना वाचवण्यासाठी आणि त्यांना लवकरात लवकर रुग्णालयात नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. स्थानिक ग्रामस्थ या प्रयत्नात मदत करत आहेत,” धामी म्हणाले. अधिका-यांनी TOI ला सांगितले की, अंधारामुळे आणि कठीण प्रदेशामुळे बचाव कर्मचार्‍यांना अडचणी येत आहेत.Uttarakhand Accident

हे ही वाचा

Uttarakhand Accident : उत्तराखंडमध्ये वऱ्हाडाची बस दरीत कोसळली; मोठ्या जिवीतहानीची भीती

 

Back to top button